घरफोड्या करणाऱ्या कुटुंबास अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

मुंबई - कचरा वेचण्याच्या नावाखाली संपूर्ण कुटुंबच घरफोडीत सामील होते, असे उघडकीस आले आहे. या प्रकरणी चौघांना नवघर पोलिसांनी अटक केली आहे. यात आरोपीसह त्याची पत्नी, बहीण आणि आणखी एका नातेवाइकाचा समावेश आहे. या तिघांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील तक्रारदार मुलुंडमधील नवघर परिसरात राहतात.

ते एका बॅंकेत व्यवस्थापक असून, त्यांची पत्नी शिक्षिका आहे. मेमध्ये ते सुटीनिमित्त राजापूर (जि. रत्नागिरी) येथे गेले होते. त्या वेळी चोरट्यांनी त्यांच्या घरातून रोख रक्कम आणि दागिन्यांसह दोन लाख 84 हजारांचा ऐवज लांबवला होता. नवघर पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल होता.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. त्याआधारे ठाणे परिसरातून प्रकाश अंबादास अव्हाड, त्याची पत्नी पूजा, बहीण अनू आणि नातेवाईक अंजली बोऱ्हाडे यांना अटक केली. विशेष म्हणजे प्रकाशची पत्नी आणि बहिणीने ही चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे.

Web Title: Burglary family arrested crime

टॅग्स