बस पार्किंगचा प्रश्‍न मिटला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

उरण - उरणमध्ये येणारी एनएमएमटी बस सेवा महापालिकेच्या परिवहन विभागाने पार्किंगअभावी बंद करण्याचे पत्रक उरण नगर पालिकेला दिले होते. ही सेवा बंद होईल यामुळे जनतेत नाराजी पसरली होती; मात्र आमदार मनोहर भोईर यांनी एमआयडीसी ऑफिससमोरील सिडकोच्या जागेत बस थांबा करण्यासाठी उरणचे मुख्याधिकारी अवधूत तावडे; तसेच ओएनजीसीसोबत चर्चा करून जागा उपलब्ध करून दिली. यामुळे पार्किंगचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

उरण नगरपालिकेच्या माध्यमातून उरण शहरात रस्त्यांचे काँक्रीटीकरण सुरू आहे. एकाच वेळी सर्व रस्ते खोदण्यात आल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे पेन्शन पार्ककडे येणारी एनएमएमटी बस सेवा बंद करून उरण चार फाटा येथील ओएनजीसीच्या जागेवर थांबत होती. ओएनजीसीने त्या जागेवर तारेचे कुंपण घातल्याने एनएमएमटी बसला फिरण्यास अडथळा निर्माण होत होता. 

शहरातील ११ महिन्यांपासून रस्त्याची कामे चालू असल्याने चार फाटा येथील ओएनजीसी येथे गाडी फिरविली जात होती; मात्र पार्किंगची समस्या निर्माण झाल्याने काही दिवस सेवा खंडित करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला होता. आता जागेचा प्रश्‍न सुटल्याने सेवा सुरूच राहणार आहे.
- अनिल शिंदे, परिवहन अधिकारी, एनएमएमटी

बससाठी पार्किंगचा प्रश्‍न तात्पुरता सुटलेला आहे; मात्र लवकरच पेन्शन पार्कपर्यंत सेवा सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- अवधूत तावडे, मुख्याधिकारी, उरण नगरपालिका

Web Title: Bus parking question is over