उद्योगांना महावितरणचे 'अभय'

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 26 मे 2018

मुंबई - वीज बिल न भरल्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या महावितरणच्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. जास्तीत जास्त औद्योगिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

या योजनेत सहभागी होणाऱ्या औद्योगिक ग्राहकांच्या मूळ थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ करण्यात येणार आहे. राज्यात सुमारे 97 हजार 464 औद्योगिक ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

राज्यातील ज्या औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे, अशा ग्राहकांसाठी महावितरणने 1 जून 2018 ते 31 ऑगस्ट 2018 या तीन महिन्यांसाठी अभय योजना जाहीर केली आहे. महावितरणचे अधिकृत संकेतस्थळ www.mahadiscom.in यावरील 'AMENESTY SCHEME 2018 या लिंकवर जाऊन ग्राहक क्रमांक व बिलिंग युनिट टाकल्यास या योजनेची व थकबाकीची संपूर्ण माहिती ग्राहकाला उपलब्ध होईल.

योजनेची वैशिष्ट्ये
थकबाकीवरील व्याज व विलंब कर माफ
97,464 ग्राहकांना लाभ
31 ऑगस्ट 2018पर्यंत योजना लागू

Web Title: business mahavitaran

टॅग्स