'डीआरआय'कडून व्यावसायिकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

मुंबई - आयात केलेल्या हिऱ्यांची किंमत अधिक दाखवणाऱ्या व्यावसायिकाला महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) अटक केली. चिराग पटेल (वय 35, रा. भाईंदर) असे त्याचे नाव आहे. आयात केलेल्या कच्च्या हिऱ्यांची किंमत अधिक दाखवल्याची माहिती मिळाल्यानुसार डीआरआयने पटेलला चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीत पटेल याने तीन कंपन्यांसाठी मागवलेल्या हिऱ्यांची किंमत अधिक दाखवल्याचे मान्य केले. डीआरआयच्या पडताळणीमध्ये पटेलशी संबंधित आठ कन्साईनमेंटची किंमत 36 कोटी दाखवली होती. ती प्रत्यक्षात अडीच कोटी असल्याचे निष्पन्न झाले. हे हिरे महागडे दाखवण्यासाठी पटेलचे साथीदार बनावट प्रमाणपत्रांचा आधार घेत होते.
Web Title: Businessman Arrested by DRI Crime