कळंबोलीत व्यावसायिकाला एक कोटीचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

नवी मुंबई - अस्तित्वात नसलेल्या आरपी धातूच्या व्यवसायातून मिळणाऱ्या कोट्यवधींच्या नफ्यातून 50 कोटी देण्याचे प्रलोभन दाखवून कळंबोलीत एका व्यावसायिकाला एक कोटी नऊ लाखांना फसविल्याचा प्रकार उघड झाला. कळंबोली पोलिस ठाण्यात याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. अशफाक हुसेनमियॉं खमसे (40) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. मार्च 2017 मध्ये अनिल साळी नावाच्या व्यक्तीने त्यांना मोबाईलवर संपर्क साधून त्यांची फसवणूक केली.
Web Title: businessman cheating crime