या उद्योगपतीचा अलिबागमधील बंगला भूईसपाट 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

शासकीय नियम धाब्यावर बसवत अनधिकृतपणे येथे बंगले बांधले आहेत मात्र प्रशासनाने आता असे बंगले भूईसपाट करण्यास सुरुवात केली आहे.

अलिबाग : अलीबाग मध्ये अनेक बड्या उद्योगपतींचे तसेच अनेक मराठी हिंदी चित्रपट कलाकारांचे मोठ-मोठे अलिशान बंगले आहेत. अनेकांनी शासकीय नियम धाब्यावर बसवत अनधिकृतपणे येथे बंगले बांधले आहेत मात्र प्रशासनाने आता असे बंगले भूईसपाट करण्यास सुरुवात केली आहे.

उद्योगपती अशोक मित्तल यांचा मांडवा जेटीजवळील कोळगाव पाच एकर परिसरात हा आलिशान बंगला आहे. 515 चौरस मीटर बांधकामाची परवानगी असताना, या बंगल्याचे 1 हजार 410 चौरस मीटर बांधकाम करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत रित्या बंधण्यात आलेला हा बंगला पाडण्यास जिल्हा प्रशासनाने सुरूवात केली आहे. निर्देशाप्रमाणे आवश्‍यक बांधकाम न हटविल्याने प्रशासनाकडून बंगल्याचे पाडकाम केले जाणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This businessman owns a bungalow in Alibaug