कळव्यातील उद्योजिकेला ‘डिजि’धन लाभ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

ठाणे - कळवा नाक्‍यावर आर्या ब्युटी पॅलेस नावाचे दुकान चालवणाऱ्या रागिनी उतेकर यांना डिजी व्यापार धन योजनेतून धन लाभ झाला असून, संपूर्ण देशभरातून त्यांना दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. 

शुक्रवारी नागपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २५ लाखांचा धनादेश आणि प्रमाणपत्र देऊन उतेकर यांना गौरवण्यात आले. चार वर्षांपासून त्या व्यवसाय करत असून, अचानकपणे मिळालेले हे पारितोषिक आणि इतकी मोठी रक्कम हे आनंददायी आहे, असे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार आणि ५०० च्या नोटा बंद केल्यानंतर कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजनांची घोषणा केली होती. त्याअंतर्गत उद्योजकांसाठी प्रधानमंत्री डिजि व्यापारी धन योजनाही होती. यात सहभागी होण्यासाठी आवश्‍यक नोंदणी झाली होती. त्यानुसार उतेकर यांचे पती राजेंद्र यांनी या योजनेत सहभाग नोंदवला होता. पंजाब नॅशनल बॅंकेच्या माध्यमातून रागिनी यांच्या दुकानात कॅशलेस व्यवहार सुरू झाले. त्यातूनच त्यांची निवड या योजनेच्या दुसऱ्या क्रमांकासाठी करण्यात आली. सोमवारी या संदर्भात त्यांना बॅंकेकडून सूचना देण्यात आली होती. त्यानुसार बॅंकेच्या मदतीने त्या नागपुरला गेल्या होत्या. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. 

व्यवसाय वृद्धीचा प्रयत्न...
कळवा नाक्‍यावर चार वर्षांपूर्वी रागिनी यांनी त्यांचे पती राजेंद्र आणि दीर अरविंद यांच्या मदतीने हे दुकान सुरू केले होते. महिलांच्या सौंदर्य प्रसाधनाच्या या दुकानातून त्यांनी व्यवसाय वाढवला आहे. नोटाबंदीच्या काळातही कॅशलेस व्यवहार करून त्यांनी या योजनेत सहभाग घेतला आणि त्यांना बक्षीसही मिळाले. रकमेचा विनियोग व्यवसायवाढीसाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Businesswoman in kalwa