एक कप चहात घ्या मुंबईत 2 घरं

मयुरेश कडव
Saturday, 21 December 2019

  • एक कप चहाची किंमत आणेल चक्कर
  • कुठे मिळतो हा महागडा चहा ???

लाखो रुपयाचा एक कप चहा. 8 कोटीची चहा पत्ती. बरळत नाही आम्ही खरं सांगतोय. टपऱ्या टपऱ्या वर 5 ते 10 रुपयांना मिळणारा चहा एवढा महाग मिळतो तरी कुठे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल नाही का? कारण एवढ्या किमतीत चहा घेण्यापेक्षा मुंबईत घर घेतलेलं काय वाईट.

 

महत्त्वाची बातमी : नियम बसवले धाब्यावर, जीव गेला तर मात्र आमची जबाबदारी नाही..
 

अहो पण हा काही साधा सुधा चहा नाहीये. हा चहा म्हणजे संजीवनी बुटीच जणू. विश्वास नाही बसत ना? तर हा एवढा महागडा चहा भारतात नाही तर चीन मध्ये मिळतोय. 

Image result for why is da hong pao tea so expensive"

 

चीन मधील वुईसन शहरात डा हॉन्ग पाओ नावाचा चहा मिळतो. हा चहा म्हणजे संजीवनी बूटीच असून हा चहा प्यायल्याने अनेक आजार दूर होतात असं बोललं जातं. या चहाचे उत्पन्न देखील कमी असल्याने हा चहा भरपूर महाग मिळतो.

महत्त्वाची बातमी : मॅडम सुट्टे पैसे घ्या आणि पाचशेची नोट द्या ना...
 

या चहाच्या चहा पावडरची किंमत प्रती किलोमागे तब्बल 8 ते 9 कोटी रुपये आहे. एवढ्या किमतीत तर मुंबई सारख्या महागड्या शहरात दोन अलिशान घरं येतील.

चीनमध्ये मिळणारा हा चहा भारतात मिळायला लागला तर आश्चर्य वाटायला नको 

WebTitle : buy two luxurious homes in mumbai at the price of tea 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: buy two luxurious homes in mumbai at the price of tea