इंद्राणी मुखर्जीलाही कारागृहात मारहाण झाल्याचे स्पष्ट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

मुंजळा शेट्येवर कारागृहामध्ये जेल अधिकाऱ्यांकडुन अमानुष अत्याचार केले जात असल्याचे बुधवारी इंद्राणीने न्यायालयासमोर सांगितले होते. याशिवाय अधिकाऱ्यांकडुन आपल्याला देखील मारहाण करण्यात आल्याचा आरोप शीनाबोरा हत्याकांडातील दोषी इंद्राणीने न्यायालयात केला होता.

मुंबई - शीना बोरा हत्याप्रकरणी कारागृहात असलेल्या इंद्राणी मुखर्जीलाही मारहाण झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. 

मुंजळा शेट्येवर कारागृहामध्ये जेल अधिकाऱ्यांकडुन अमानुष अत्याचार केले जात असल्याचे बुधवारी इंद्राणीने न्यायालयासमोर सांगितले होते. याशिवाय अधिकाऱ्यांकडुन आपल्याला देखील मारहाण करण्यात आल्याचा आरोप शीनाबोरा हत्याकांडातील दोषी इंद्राणीने न्यायालयात केला होता. त्यानंतर इंद्राणी मुखर्जीची वैद्यकीय तपासणी करुन त्यासंबधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. 

त्यानुसार आज (गुरुवार) तपासण्या करुन जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांनी हा अहवाल तयार केला आहे. यात इंद्राणीच्या हातावर आणि शरीरावर जखमा असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता हा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंजळा शेट्येच्या हत्येनंतर इंद्राणीच्या या अहवालामुळे कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
राज ठाकरेंकडून बाळा नांदगावकरांच्या समर्थकांची उचलबांगडी
बुलडाणा: मलकापूरमध्ये गोळीबार; एक गंभीर जखमी
दोनशेच्या नोटांची छपाई सुरू
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी​
ठाणे: स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ​
कर्जमाफीसाठी निकषांची जंत्री; काही अटींमुळे अडसर शक्य​
सातारा: भाजप जिल्ह्याध्यक्षांच्या भावावर गोळीबार​
राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही तत्त्वाची लढाई : सोनिया गांधी

Web Title: Byculla jail riots: Indrani has blunt injuries, confirms medical report