पालघर लोकसभा पोटनिवडणूकीत विक्रमगडचा वरचष्मा

election
election

मोखाडा (पालघर) : पालघर लोकसभा पोटनिवडणूकीचे मतदान 53:22  टक्के झाले आहे. सहा विधानसभा मतदारसंघापैकी, सर्वाधिक मतदान 62:64 टक्के विक्रमगड विधानसभेचे झाले आहे. या मतदार संघात भाजपमध्ये झालेले इनकमींग, श्रमजीवी संघटनेने दिलेला पाठींबा, योग्य कॅम्पॅनिंग आणि राष्ट्रवादीच्या छुप्या पाठींब्यामुळे, भाजपला सर्वाधिक मतदान होण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे भाजपचे उमेदवार राजेंद्र गावीत यांच्या विजयाच्या आशा वाढल्या आहेत. 

अटीतटीच्या आणि प्रतिष्ठेच्या केलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणूकीत, आदिवासी भागात, शहरी भागाच्या तुलनेने मतदानाची टक्केवारी वाढली आहे. सर्वाधिक मतदान विक्रमगड विधानसभा क्षेत्राचे झाले आहे. एकूण विक्रमगड विधानसभेचे 2 लाख 53 हजार आहे, त्यापैकी 1 लाख 58 हजार मतदान झाले असून, 62 : 64 टक्के इतके झाले आहे. तर सर्वात कमी मतदान नालासोपारा येथे झाले आहे. नालासोपाऱ्याचे अवघे  34 : 83 टक्के मतदान झाले आहे. 

विक्रमगड विधानसभा हा आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णु सवरा यांचा मतदारसंघ आहे. या मतदार संघात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कोकण विकास मंच आणि जिजाऊ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांचे चांगलेच प्रभुत्व आहे. त्यांनाच भाजप ने गळाला लावले, त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढीत त्याचा मोठा हातभार लागला आहे. तसेच आदिवासी भागात विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेचे पाळेमुळे खेड्यापाड्यात, पोहोचलेली आहेत. त्याचाही फायदा मतदानाच्या वाढीव टक्केवारी साठी झाला आहे. विवेक पंडित यांनी भाजप ला पाठींबा दिला आहे. त्यामुळे त्याचाही फायदा भाजपला होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, स्थलांतरित झालेला आदिवासी, पावसाळ्यापुर्वी, काही प्रमाणात घरी परतला असल्याने मतदानाची टक्केवारी वाढली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत, 1 लाख 65 हजार मतदान झाले होते. त्या तुलनेत केवळ  7  हजार मतांनी या पोटनिवडणूकीत मतदान झाले आहे. 

या पोटनिवडणूकीत भाजप, मध्ये झालेले इनकमींग तसेच नाशिक विभागातील आमदार, नगरसेवक, जिल्हा बँकेचे संचालक आणि स्थानिक नेत्यांनी योग्य कॅम्पॅनिंग केल्याचे दिसून आले आहे. भाजपने गाजावाजा न करता, छुपा आणि नियोजन पुर्वी प्रचार केला आहे. तर जव्हार भागात शिवसेनेचा गट , तटस्थ राहिल्याचे आणि राष्ट्रवादीचा छुपा पाठींबा भाजप ला दिला असल्याचे बोलले जात आहे. या सर्व बाबींचा परिणाम म्हणून, भाजप ला या मतदारसंघातुन मताधिक्य मिळण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

मोखाडा तालुक्यात शिवसेनेने, खेड्यापाड्यांमध्ये जाऊन प्रचार केला आहे. योग्य नियोजन, शिवसेना पक्ष प्रमुख ऊध्दव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, खासदार अरविंद सावंत यांच्या सातत्य पूर्ण दौऱ्याने, मोखाड्यात शिवसेनेचे मतदान वाढण्याची शक्यता आहे. तर वाडा तालुक्यातील कंचाड जिल्हा परिषद गटात ही शिवसेनेने, प्रचाराची योग्य रणनीती आखली होती. त्यामुळे कंचाड आणि मोखाड्यात शिवसेना आघाडी वर असण्याची शक्यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com