सीएची परीक्षा पुढे ढकलली, परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

तेजस वाघमारे
Wednesday, 14 October 2020

सनदी लेखापाल (सीए) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता 21 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सनदी लेखापाल (सीए) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता 21 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.

'आयसीएआय'तर्फे आयोजित करण्यात आलेली परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन वेळा पुढे ढकलली होती. 1 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात येणारी परीक्षाही आयसीएआयने पुढे ढकलली आहे. नवीन वेळापत्रकानुसार 21 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2020 या कालावधीत ही परीक्षा होईल. फाऊंडेशन कोर्स (नवीन अभ्यासक्रम), इंटरमीजीएट कोर्स (नवा आणि जुना अभ्यासक्रम), फायनल कोर्स (जुना आणि नवा अभ्यासक्रम), इंटरनॅशनल ट्रेड लॉ अँड वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल टॅक्सेशन या सर्व परीक्षा या कालावधीत होतील. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी 'आयसीएआय'चे संकेतस्थळ पाहावे असे आवाहन आयसीएआयने केले आहे.

अधिक वाचाः  आता मास्क न वापरणाऱ्यांची खैर नाही, पोलिसांच्या मदतीने पालिका करणार कारवाई

तसंच केंद्र किंवा राज्य सरकारच्या सार्वजनिक सुट्ट्या असल्या तरी सीए परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही हे उमेदवारांनी ध्यानात घ्यावे, आयसीएआयने स्पष्ट केले आहे.

सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात आल्यात. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार 1 ते 18 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या परीक्षा आता 21 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर या काळात होतील, त्याचे सविस्तर वेळापत्रक 'आयसीएआय'च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे,' अशी माहिती 'आयसीएआय'च्या केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे यांनी दिली.

अधिक वाचाः कोरोना औषधांसाठी प्रशासन-सरकारमध्ये समन्वय हवा, मुंबई उच्च न्यायालय

फाउंडेशन कोर्स परीक्षा

8, 10, 12 आणि 14 डिसेंबर 2020

इंटरमेडिएट (Ipc) कोर्स परीक्षा - जुन्या स्कीमनुसार

ग्रुप 1 - 22, 24, 26 आणि 28 नोव्हेंबर 2020
ग्रुप 2 - 1, 3 आणि 5 डिसेंबर

नोव्हेंबरमधील दोन एमपीएससी पूर्व परीक्षा लांबणीवर

इंटरमेडिएट कोर्स परीक्षा - नव्या स्कीमनुसार

ग्रुप 1 - 22, 24, 26  आणि 28 नोव्हेंबर 2020
ग्रुप2 - 1, 3, 5 आणि 7 डिसेंबर

फायनल कोर्स परीक्षा - नव्या स्कीमनुसार

ग्रुप 1 - 21, 23, 25 आणि 27 नोव्हेंबर 2020
ग्रुप 2 - 29 नोव्हेंबर, 2, 4 आणि 6 डिसेंबर 2020

तर उर्वरित 289 विद्यार्थ्यांचे नुकसान; 70:30 कोट्यावर सरकारची भूमिका

इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंट टेक्निकल परीक्षा (IRM)

मॉड्युल्स 1 ते 4 - 21, 23, 25 आणि 27 नोव्हेंबर 2020

इंटरनॅशनल ट्रेड लॉज अँड वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (ITL & WTO) पार्ट - 1 परीक्षा

ग्रुप ए - 21 आणि 23 नोव्हेंबर 2020
ग्रुप बी - 25 आणि 27 नोव्हेंबर 2020

मराठा आरक्षण: अकरावी, इंजिनीअरिंग प्रवेश खोळंबलेलेच

इंटरनॅशनल टॅक्सेशन - असेसमेंट टेस्ट

21 आणि 23 नोव्हेंबर 2020

------------

(संपादनः पूजा विचारे)

CA exam 2020 postponed New exam schedule announced


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CA exam 2020 postponed New exam schedule announced