'कॅग' अहवालात राफेलची किंमत - सीतारामन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

मुंबई - राफेल विमानाच्या खरेदीची किंमत नियमानुसार "कॅग' अहवालात आहे. हा अहवाल सांसदीय समितीकडे जेव्हा जाईल, तेव्हा ती किंमत आपोआप समोर येईलच. कॉंग्रेसने केवळ राजकारणासाठी हा विषय समोर आणला असल्याचा आरोप संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. मुंबईत सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

'न्यायालयात सरकारने चुकीची माहिती दिली आहे, "कॅग' अहवाल आमच्यापर्यंत पोचला नाही, या आरोपाचा प्रतिवाद करताना त्या म्हणाल्या, न्यायालयात आम्ही सादर केलेल्या स्पष्टीकरणाची प्रत आता सार्वजनिकरीत्या उपलब्ध आहे. ती वाचली तर यात कोण बरोबर आणि कोण चूक ते कळेल. संरक्षण खरेदी साहित्याची किंमत कम्प्ट्रोलर ऍण्ड ऑडिटर जनरल यांना सांगण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून ती समोर येईल,'' असे त्या म्हणाल्या.

दुरुस्ती पत्राबाबत मौन
राफेल निकालाप्रकरणी सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या दुरुस्ती अर्जासंबंधी कोणतीही माहिती देण्यास निर्मला सीतारामन यांनी नकार दिला. काही तपशील उघड करणे योग्य नाही. शिवाय हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यासंबंधीची माहिती देणे आपल्याला शक्‍य होणार नाही, असे सांगून निर्मला सीतारामन यांनी त्या विषयावर बोलण्यास साफ नकार दिला.

Web Title: Cag report rafael plane amount Nirmala Sitaraman