गावठी दारूभट्ट्यांविरोधात मोहीम

नेरळ पोलिसांकडून गावठी हातभट्टी उध्वस्त
नेरळ पोलिसांकडून गावठी हातभट्टी उध्वस्त

नेरळ : येथील पोलिसांनी गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्ट्यांविरुद्ध कारवाई पुन्हा एकदा सुरू केली आहे. गेले काही दिवस ही मोहीम थंडावलेली होती. नेरळ परिसरातील चिंचवाडी येथे शुक्रवारी (ता. २३) पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली असून, सुमारे ५० हजारांचा माल उद्‌ध्वस्त केला.

चिंचवाडीच्या जंगलात गावठी दारू बनविली जात असल्याची माहिती नेरळ पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने पथक नेमून माहितीच्या आधारे चिंचवाडीच्या जंगलात शोध घेतला. त्या वेळी त्यांना त्या ठिकाणी गावठी हातभट्टी सापडली. या वेळी नेरळ पोलिसांना २०० लिटर क्षमतेच्या सहा निळ्या प्लास्टिकच्या टाक्‍या, त्यात १५० लिटरप्रमाणे ९०० लिटर एवढे नवसागर गूळ मिश्रित साहित्य, दगडाची चूल, त्यावर पत्र्याच्या टाकीत नवसागर गूळ मिश्रित रसायन असा एकूण ४७ हजार रुपये किमतीचा गावठी दारू बनविण्याचा मुद्देमाल सापडला. ही गावठी दारू नेरळ पोलिसांनी नष्ट केली.

याबाबत नेरळ पोलिसांनी संशयित भानुदास जानू कोकरे (रा. चिंचवाडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, नेरळ पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक येरूनकर तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com