प्रचाराला फेसबुकचा आधार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

डोंबिवली - निवडणुकीअगोदर आणि निवडून आल्यानंतर राजकीय मंडळींचा "फेस' (चेहरा) हा बदलत असतो, हे काही सामान्यांना नवीन नाही; मात्र ही फेस बदलणारी मंडळी निवडणुकीच्या तोंडावर आपला चांगला "फेस' जगासमोर आणण्यासाठी फेसबुकचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. नगरपालिका निवडणुकांसाठी फेसबुकचा प्रभावी वापर करण्यात आला होता. सोशल मीडिया आचारसंहितेबाहेर असल्याने होऊ घातलेल्या ठाणे आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच फेसबुकला राजकीय आखाड्याचे रूप प्राप्त होणार, यात काही शंका नाही. 

निवडणूकपूर्व काळात राजकीय नेत्यांना फेसबुकचा मोठा आधार वाटत असतो. त्यात सोशल मीडियावरील प्रचारावर निवडणूक आचारसंहितेचे कोणतेही निर्बंध लागू नसल्यामुळे मैदानांपेक्षा सोशल मीडियावर जोमाने प्रचार केला जात असल्याचे आजवरच्या विविध निवडणुकांमध्ये समोर आले आहे. त्यामुळे निवडणुकीपुरते का होईना; आपली नागरिकांशी किती नाळ जोडली आहे हे सिद्ध करण्यासाठी फेसबुक माध्यम राजकीय मंडळींसाठी मोठे वरदान ठरत आहे. 

* कार्यकर्त्यांवर जबाबदारी 
फेसबुकवरून पक्षाचा प्रचार करण्याची मुख्य जबाबदारी कार्यकर्त्यांवर असते. पक्षाच्या ठिकठिकाणी होणाऱ्या सभांच्या आयोजनाची माहिती, पक्षाची कामे, उमेदवाराची कामे, सभा संपन्न झाल्यानंतर सभेतील मनोगत, फोटो, सभेला होणाऱ्या गर्दीचे फोटो फेसबुकच्या माध्यमातून कार्यकर्ते नेटकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतात. 

* निवडणूकपूर्व काळात पक्षाच्या ठिकठिकाणच्या कार्यालयात सभा आयोजित केल्या जातात आणि कार्यकर्त्यांना आपापल्या पक्षांचा आणि उमेदवाराचा अधिकाधिक प्रचार सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून करा, अशा प्रकारच्या सूचना दिल्या जातात, असे एका प्रमुख राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने सांगितले. 

Web Title: By campaigning to Facebook