मोदींना 'नोटाबंदी'तून बाहेर येऊन राममंदिर बांधता येईल काय?: सेना

टीम ईसकाळ
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयावर शिवसेनेने 'सामना'तील अग्रलेखातून तीव्र टीका केली आहे. नोटाबंदीमुळे आर्थिक अराजक माजूनही मोदी ते मान्य करायला तयार नसल्याचा आरोप सेनेने केला आहे. ' 'नोटाबंदी'च्या प्रवचनातून बाहेर पडून अयोध्येत मंदिर बांधता येईल का?', असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर केलेल्या टीकेची अग्रलेखातून दखल घेतली आहे. 'आजचा देश हा आधीच्या राज्यकर्त्यांनीच उभा केला. त्यांनी कदाचित काही चुका किंवा घोटाळे केले असतील, नव्हे ते केले आहेतच; पण असे अनेक "सुखराम' नंतर भाजपच्या गंगेत पावन करून घेतले गेलेच ना? सत्तेची पेज देईल त्याची "शेज' गरम करण्याचे धोरण हासुद्धा भ्रष्टाचारच आहे व रेनकोट घालून आंघोळ केली तरी त्यामुळे अंग भिजल्याशिवाय राहत नाही', अशा शब्दांत भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.

अग्रलेखातून मोदींवर टीका करताना काँग्रेसचे कौतुक करण्यात आले आहे. " "नोटाबंदी' किंवा आर्थिक घोटाळ्यांबाबत काँग्रेसला ठोकण्याची एकही संधी मोदी सोडत नाहीत. मोदी यांनी या नकारात्मक भूमिकेतून बाहेर पडले पाहिजे. काँग्रेसने चोऱ्यामाऱ्या करूनच राज्य कारभार केला हे मान्य केले तरी ज्या देशात स्वातंत्र्याच्या वेळी सुईदेखील बनत नव्हती तो देश आज आर्थिक व औद्योगिक बाबतीत खूपच पुढे गेला आहे. देशाची आजची प्रगती ही फक्त मागच्या दोनेक वर्षांत होऊ शकत नाही', अशा शब्दांत काँग्रेसचे कौतुक केले आहे.

Web Title: Can Modi make Ramtemple - Sena