समांतर आरक्षणाचे परिपत्रक रद्द करा - बडोले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

मुंबई - मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील आरक्षणाच्या पदांपासून रोखणारे 13 ऑगस्ट 2014 चे समांतर आरक्षणाचे परिपत्रक तातडीने रद्द करा आणि नवीन सुधारित परिपत्रक जारी करा, असे निर्देश सामाजिक न्याय आणि विशेष सहायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे दिले. 

मुंबई - मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील आरक्षणाच्या पदांपासून रोखणारे 13 ऑगस्ट 2014 चे समांतर आरक्षणाचे परिपत्रक तातडीने रद्द करा आणि नवीन सुधारित परिपत्रक जारी करा, असे निर्देश सामाजिक न्याय आणि विशेष सहायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे दिले. 

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी मागासवर्गीय आरक्षण व समांतर आरक्षणासंबंधी निर्माण झालेल्या प्रश्नाविषयी आज मंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. ते म्हणाले, की सामाजिक आरक्षण प्रवर्गातील उमेदवार गुणवत्तेच्या आधारे खुला प्रवर्गातील त्यांच्या कोट्याव्यतिरिक्त निवडले जाऊ शकत होते. मात्र, आघाडी शासनाच्या कार्यकाळात निर्गमित झालेल्या या परिपत्रकामुळे हे सामाजिक आरक्षणाला लागू असलेले तत्त्व समांतर आरक्षणाला लागू होत नसल्यामुळे गुणवत्तेमध्ये असूनही मागासवर्गीय उमेदवारांवर या परिपत्रकामुळे अन्याय होत आहे. समांतर आरक्षणाच्या 13 ऑगस्ट 2014 रोजीच्या शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार मागासवर्गीय उमेदवारांचा खुल्या प्रवर्गातील समांतर आरक्षणाच्या पदांसाठी विचार करता येत नाही. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळातील 13 ऑगस्ट 2014 चे परिपत्रक रद्द करून तातडीने सुधारित परिपत्रक काढण्याच्या सूचना आजच सामान्य प्रशासन विभागास दिल्याचे बडोले म्हणाले. 

"" समांतर आरक्षण अंमलबजावणीपद्धती विषयीच्या संबंधित परिपत्रकात खुला-महिला, खुला खेळाडू व खुला माजी सैनिक या समांतर आरक्षणाच्या पदांवर फक्त खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचीच शिफारस केली जाते. हा सामाजिक आरक्षणाच्या तत्त्वालाच छेद वाटतो.'' 
राजकुमार बडोले, सामाजिक न्याय मंत्री 

Web Title: Cancel the parallel reservation circular says Rajkumar Badole