राकेश रोशन यांना कर्करोगाचे निदान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 जानेवारी 2019

अभिनेते ह्रतिक रोशनने इन्स्टाग्रॅमवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये वडिल राकेश रोशन यांना कर्करोगाचे निदान झाले असल्याचे त्याने म्हटले आहे. राकेश रोशन यांना प्राथमिक अवस्थेतील घशाचा कॅन्सर झाला आहे. 

अभिनेते ह्रतिक रोशनने इन्स्टाग्रॅमवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये वडिल राकेश रोशन यांना कर्करोगाचे निदान झाले असल्याचे त्याने म्हटले आहे. राकेश रोशन यांना प्राथमिक अवस्थेतील घशाचा कॅन्सर झाला आहे. 

ह्रतिकने आपल्या पोस्टमध्ये ‘आज सकाळी मी वडिलांना सोबत एक फोटो काढण्यासाठी विचारले. सर्जरीच्या दिवशीही ते जीमला येणे विसरणार नाहीत याची खात्री होती. माझ्या परिचयात असणाऱ्यांपैकी ते सर्वात कणखर व्यक्ती आहते. काही आठवड्यांपूर्वी त्यांना प्राथमिक अवस्थेतील घशाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. पण या लढ्याला ते अत्यंत उमेदीने सामोरे जात आहेत. आम्हाला त्यांच्यासारखा कुटुंबप्रमुख लाभला हे आमचे भाग्य आहे’. असे म्हटले आहे.

Web Title: Cancer diagnosis to Rakesh Roshan