उमेदवार व कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या श्रीमुखात लगावली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

नवी मुंबई - पनवेलमध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान भाजपच्या उमेदवार वैशाली ठाकूर व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते प्रकाश शिवकर यांनी एकमेकांच्या श्रीमुखात लगावली. दोघांनी परस्परविरोधी तक्रार दिली असून, शिवीगाळ व हाताने मारहाण केल्याबाबतचे गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील बाजारे यांनी दिली.

पनवेलमधील व्ही. के. हायस्कूलमध्ये पंचायत समिती व रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी गुरुवारी मतमोजणी झाली. येथे अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. भाजप-शिवसेना व शेकाप-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची विभागणी व्हावी, यासाठी दोन वेगवेगळ्या जागा दिल्या होत्या. यांच्यातूनच मतमोजणीसाठी उमेदवार व त्यांच्यासोबत पोलिंग एजंटला सोडले जात होते. केळवणे पंचायत समितीची मतमोजणी संपल्यानंतर निकाल घोषित झाला. भाजपच्या उमेदवार वैशाली ठाकूर यांचा पराभव झाला.
वैशाली ठाकूर केंद्रातून बाहेर पडताना त्यांच्यात व प्रकाश शिवकर यांच्यात शिवीगाळ झाली. एकमेकांच्या अंगावर धावत जाऊन त्यांनी एकमेकांच्या श्रीमुखात लगावली. मतमोजणी केंद्रावर पोलिस असतानाही भांडण अधिक विकोपाला जण्याआधीच पोलिसांनी मध्यस्थी करून ते सोडविले.

Web Title: candidate beating in new mumbai