सोशल मीडियावरून उमेदवारांचा प्रचार तेजीत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

मुंबई - महापालिका निवडणूक प्रचाराच्या तोफा रविवारी सायंकाळी थंडावल्यानंतर उमेदवारांनी दुसऱ्या दिवशी प्रचारासाठी फेसबुक, व्हॉटसऍप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटची मदत घेतली आहे.

मतदान केंद्राची माहिती असलेल्या व्होटर लिस्टमार्फतही कार्यकर्ते मतदारसंघ पिंजून काढत आहेत. प्रचार फेऱ्यांशिवाय उमेदवारांचा गल्लोगल्ली प्रचार तेजीत सुरू असल्याचे चित्र शहरात सर्वत्र पाहण्यास मिळत आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होत आहे. युती आघाडीच्या गोंधळात उमेदवारांची यादी उशिरा जाहीर झाल्याने उमेदवारांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळाला नव्हता. उमेदवारांनी मिळालेल्या दिवसांमध्ये वॉर्ड दोन वेळा पिंजून काढला असला, तरी सर्व राजकीय पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने उमेदवारांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे उमेदवार साम, दाम, दंड आदी मार्ग वापरून प्रचार करत आहेत. निवडणूक प्रचाराच्या तोफा रविवारी सायंकाळी थंडावल्या. मतदानाला आणखी एक दिवसाचा कालावधी शिल्लक असल्याने उमेदवारांनी सोमवारी (20 फेब्रुवारी) फेसबुक, व्हॉटसऍप आदी सोशल नेटवर्किंग साईटवरून आपला प्रचार सुरूच ठेवला.

उमेदवारांकडून मतदारांना मतदानाचे ठिकाण, यादी क्रमांक आदी माहिती असलेली व्होटर स्लीप घरोघरी वाटप होत आहे. यावर उमेदवारांनी आपला फोटो, निवडणूक चिन्ह आणि आपल्यालाच निवडून देण्याची जाहिरात करत आहेत. त्यामुळे प्रचार थांबला असला, तरी उमेदवारांची निशाणी कार्यकर्त्यांमार्फत सोमवारीही घराघरात पोहचली आहे.

Web Title: candidate publicity on social media