उमेदवारांना चिंता स्थलांतरितांची! 

रश्‍मी पाटील - सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

ठाणे - ठाणे पालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बहुतांश सर्वच पक्षांचे कार्यकर्ते त्यांच्या प्रभागातील मतदारांना त्यांचा मतदान क्रमांक व पोलिंग बूथची माहिती देणाऱ्या चिठ्ठ्यांचे वाटप करतात. या चिठ्ठ्या देण्याच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा शेवटच्या फेरीत मतदारांच्या दृष्टिक्षेपात येण्याचा प्रयत्न करतात. पण यंदाच्या निवडणुकीत स्थलांतरित झालेल्या मतदारांची संख्या अधिक असल्याने त्याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येतआहे. जुन्या इमारतींमधील अनेक जण घोडबंदर येथील नवीन गृहसंकुलात गेले.

ठाणे - ठाणे पालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बहुतांश सर्वच पक्षांचे कार्यकर्ते त्यांच्या प्रभागातील मतदारांना त्यांचा मतदान क्रमांक व पोलिंग बूथची माहिती देणाऱ्या चिठ्ठ्यांचे वाटप करतात. या चिठ्ठ्या देण्याच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा शेवटच्या फेरीत मतदारांच्या दृष्टिक्षेपात येण्याचा प्रयत्न करतात. पण यंदाच्या निवडणुकीत स्थलांतरित झालेल्या मतदारांची संख्या अधिक असल्याने त्याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येतआहे. जुन्या इमारतींमधील अनेक जण घोडबंदर येथील नवीन गृहसंकुलात गेले. रिकाम्या जागांमध्ये भाडेकरू आले आहेत; पण हे भाडेकरू त्या प्रभागातील उमेदवाराचे मतदार नाहीत. त्यामुळे स्थलांतरित झालेले हे मतदार उमेदवारांसाठी "एनकॅश न होणारी वोट बॅंक' ठरत आहे. 

गेल्या दहा वर्षांत ठाणे शहराचा प्रचंड प्रमाणात विस्तारले आहे. प्रामुख्याने घोडबंदर भागात सर्व अत्याधुनिक सुविधा असलेल्या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्याने या भागाचा झपाट्याने विकास झाला. 

जुने ठाणे आणि उड्डाणपुलांच्या पल्याड वाढलेले हे "कॉस्मो ठाण्या'ने अनेकांना भुरळ घातली. त्यामुळे सधन परिस्थिती असलेल्या नागरिकांनी जुनी घरे भाड्याने देत अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा टोलेजंग इमारतींमध्ये वास्तव्यास जाणे पसंत केले. वृंदावन सोसायटी, श्रीरंग सोसायटी, नौपाडा, पाचपाखाडी येथे अशी परिस्थिती दिसते. 

राबोडी परिसरात गेल्या काही वर्षांत घडलेल्या काही अप्रिय घटनांमुळे येथील बराच मतदार स्थलांतरित झाला आहे. वृंदावन, श्रीरंग, राबोडी, नौपाड्यातील अनेक इमारती या चार ते पाच मजल्यांच्या आहेत. या भागांतील बहुतांश इमारतींमध्ये किमान तीन ते चार घरांत भाडेकरू आहेत. अनेक इमारतींच्या चौथ्या मजल्यांवर केवळ भाडेकरूच आहेत. त्यामुळे इथल्या जुन्या मात्र आता स्थलांतरित मतदारांपर्यंत पोहोचण्यास उमेदवार असमर्थ ठरत आहेत. या स्थलांतरित उमेदवारांमध्ये नोकरीनिमित्त शहराबाहेर गेलेले स्थलांतरित, लग्न होऊन गेलेल्या मुलींची संख्याही मोठी आहे. आपल्या मूळ मतदारसंघापासून दूर गेलेला मतदार मतदानासाठी इथे येईल का, असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे. 

मतदारांच्या दारोदारी जाऊन मतदार यादी क्रमांक व पोलिंग बूथची माहितीपत्रिका देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना अनेक मतदार स्थलांतरित झाल्याचे निदर्शनास आले आहे. 
- अजित देसाई, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते.

Web Title: Candidates migrants worry