मतदार राजाच्या सहलीमुळे उमेदवार चिंतेत

मतदार राजाच्या सहलीमुळे उमेदवार चिंतेत
मतदार राजाच्या सहलीमुळे उमेदवार चिंतेत

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या सोमवारी (ता. २१) होणाऱ्या मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रविवार आणि सोमवार अशी सलग दोन दिवस सुट्टी असल्यामुळे मतदार सहलीसाठी जाण्याची शक्‍यता आहे; त्यामुळे उमेदवार चिंतेत पडले आहेत.

रविवार आणि सोमवार असे दोन दिवस जोडून सुट्टी असल्यामुळे अनेकांनी मुंबईबाहेर जाण्याचा बेत आखला आहे. सहलीला जाणाऱ्यांचे प्रमाण मोठे असल्यास मतदानाचा टक्का घसरण्याची शक्‍यता आहे. त्यातच सहल, पदभ्रमण, गिर्यारोहणासाठी जाणाऱ्यांत तरुणांची संख्या जास्त असल्यामुळे सत्ताधाऱ्यांसह सर्व पक्षांचे उमेदवार धास्तावले आहेत. युवा मतदारांना ‘थांबवण्या’साठी राजकीय पक्षांनी युवा नेत्यांचा आधार घेतला आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या त्यांच्या प्रयत्नांना किती यश आले, हे प्रत्यक्ष सोमवारी मतदानाच्या दिवशीच समजणार आहे.

सोसायट्यांत आवाहन
हक्काचे मतदार शहराबाहेर जाऊ नयेत म्हणून उमेदवारांनी मोर्चेबांधणी केली आहे. राजकीय पक्षांचे पदाधिकारी शनिवारी सायंकाळपासूनच निवासी संकुलांत जाऊन रहिवाशांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com