गडकरी म्हणतात, 'मल्ल्याजी' चोर कसे?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

मुंबई : एखाद्या वेळेस थकबाकीदार झाले म्हणून विजय 'मल्ल्याजी' चोर कसे होऊ शकतात? असा प्रश्न विचारत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चक्क भारतातील बॅंकांना सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याची पाठराखण केली आहे. गडकरींच्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, 'विजय मल्ल्या 40 वर्ष नियमितपणे व्याज भरत होते. त्यानंतर त्यांनी हवाई वाहतूक क्षेत्रात प्रवेश केला आणि ते अडचणीत आले. व्यवसायात चढ-उतार येतच असतात. त्यामुळे एखाद वेळेस मल्ल्याजी थकबाकीदार झाले, तर त्यांना चोर किंवा फ्रॉड कसं म्हणणार? ही मानसिकताच गैर आहे. रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता कायम आहेच. मोदी सरकारने ती उद्ध्वस्त करण्याचा कोणताही प्रयत्न कधीच केला नाही. मात्र, देशाच्या अर्थमंत्र्याने ठरविलेल्या धोरणाशी सुसंगत काम करणे देखील आवश्यक आहे. त्यामुळे  केंद्र सरकारच्या विकासविषयक धोरणांना पाठिंबा देण्याचे देखील रिझर्व्ह बँकेची जबाबदारी आहे.'

'आपल्याकडे एखाद्याची आर्थिक स्थिती बिघडली की आधी त्याचा गळा दाबला जातो. डॉक्टरकडे गेल्यांनतर क्रिटीकल पेशंटला आयसीयूमध्ये भरती केले जाते, त्याला ऑक्सिजन लावला जातो. मात्र, आपल्याकडे बँकांमधील परिस्थिती एकदम याउलट आहे. नीरव मोदी किंवा मल्ल्याने किंवा यांसारख्या व्यक्तींनी गुन्हा केला असेल तर त्यांना नक्की तुरुंगात टाकले पाहिजे. मात्र, आर्थिक अडचणीत सापडलेल्या प्रत्येकाला कर्जबुडवा ठरविणे चुकीचे आहे,' असेही गडकरी म्हणाले.

Web Title: Cant call Vijay Mallya thief for one default he paid taxes for 40 years