बिअरवरही गाडी धावू शकेल!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

मुंबई - बिअरवर आता गाडी चालू शकते, हे ऐकून तुम्हाला आश्‍चर्याचा धक्काच बसला असेल. तसा व्हिडीओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे खरेच शक्‍य आहे का, पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा बिअरवर गाडी चालवणे सर्वसामान्यांना परवडेल का, असा प्रश्‍न सर्वांनाच पडला. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘साम’ वाहिनीच्या प्रतिनिधींनी या व्हिडीओची पडताळणी केली असता हे शक्‍य असले तरी फार खर्चिक असल्याचे स्पष्ट झाले.

काही दिवसांपासून सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. बिअरवरही मोटार धावू शकेल, असा दावा यात करण्यात आला आहे. बिअरपासून इंधन बनवण्यात संशोधकांना यश आले असून, २०२२ पर्यंत हा प्रयोग यशस्वी होईल, असेही त्यात सांगण्यात आले आहे; मात्र हा प्रयोग खर्चिक असल्याचे लक्षात आल्याने अनेक प्रश्‍न निर्माण झाले. त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी ‘साम’च्या प्रतिनिधींनी ऑटो एक्‍स्पर्टची भेट घेतली. ऑटो एक्‍स्पर्ट प्रा. श्‍याम सुंदर भोगा यांना संबंधित व्हिडीओ दाखवण्यात आला. बियरमध्येच नव्हे; तर अल्कोहोलमध्ये असलेल्या इथेनॉलला ब्यूटेनॉलमध्ये कन्व्हर्ट करून त्यापासून मोटार चालवणे शक्‍य आहे, असे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर स्पष्ट झाले; मात्र यामुळे गाडीचे नुकसानही होऊ शकते आणि हा प्रयोग सर्वसामान्यांना परवडणारा नाही, असेही भोगा यांनी सांगितले.

नेमकं सत्य काय?
बिअरमधील इथेनॉलमुळे गाडी चालू शकते
कार्बन मोनोऑक्‍साईड, सल्फरडाय ऑक्‍साईडमुळे वायुप्रदूषणाचा धोका
मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषणही होऊ शकते
बिअरवर गाडी चालवणे अधिक खर्चिक

Web Title: car can run on beer This video viral on social media