कार चालकाला ठोठावला हेल्मेट न घातल्याचा दंड; ई चलान पाहून चालकाची पोलिसांत धाव

तुषार सोनवणे | Saturday, 22 August 2020

मुंबई आणि उपनगरातील तुफान वाहतूकीला शिस्त लागावी म्हणून वाहतूकीची शिस्त मोडणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. आता ईचलानद्वारेही वाहनचालकांवर कारवाई केली जाते. परंतु हे ईचलान सदोष असल्याचे वृत्त समोर आले आहे.

मुंबई - मुंबई आणि उपनगरातील तुफान वाहतूकीला शिस्त लागावी म्हणून वाहतूकीची शिस्त मोडणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. आता ईचलानद्वारेही वाहनचालकांवर कारवाई केली जाते. परंतु हे ईचलान सदोष असल्याचे वृत्त समोर आले आहे.

कोरोनामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत गणेशमुर्ती विक्रीत घट; खबरदारी म्हणून प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद

मुंबई वाहतूकीचे नियम हे पाळावेच लागता. त्यात सध्या तर कोरोनासारख्या महामारीचे दिवस आहेत.त्यामुळे वाहतूकीचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. परंतु तरी सुद्धा काही हौशी वाहनचालक शिस्तीचे उल्लंघन करताना दिसून येतात. पंतु अशा बेशिस्त वाहनचालकांवर ईचलान द्वारे कारवाई केली जाते,. त्याभीतीपोटी वाहनचालक आपल्याला घालून दिलेल्या नियमानूसार वाहन चालवत असतात. परंतु सर्व नियम पाळून देखील आपल्याला ईचलानद्वारे दंड पाठवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे ईचलान दंड आकारण्यातही गोंधळ होऊ शकतो हे स्पष्ट झाले आहे.

कांदीवलीत पूर्व भागात राहणाऱ्या हमीर जोशी यांच्या मोबाईल क्रमांकावर वाहतूक विभागाच्या दंडाचा संदेश आला . त्यांना कार चालवताना कोणत्याही वाहतूक पोलिसांनी अडवले नाही किंवा लायसेन्स व अन्य कागदपत्रांची विचारणा केली नाही. तरी त्यांना सात ते आठ विविध कारणाच्या दंडाचे ईचलानाचा संदेश आले. त्यातील एका चलनात त्यांना हेल्मेट नसल्याच्या कारणावरून दंड आकरण्यात आला होता. यामुले हमीर यांना कारमध्ये बसून हेल्मेट कसे वापरावे हा प्रश्न पडला.

सीबीआयसह फॉरेन्सिक विभागातील अधिकारी सुशांतसिंहच्या घरी दाखल; सखोल तपास सुरू

यासंबधी त्यांनी संकेतस्थळावर जाऊन अधिकची माहित घेतली तेव्हा त्या चलनातील दंडाच्या समोर एका दुचाकीचे फोटो होते. हमीर यांच्याकडे कार असताना दुचाकीच्या दंडाचे फोटो आणि ईचलान त्यांना मिळाल्याने ते चक्राऊन गेले,. परंतु हमीर यांनी याबाबत पोलिसांना कळवले आहे. पोलिसांनीही याप्रकरणी लक्ष घालत नक्की गोंधळ कुठे झालाय याचा तपास सुरू केलाय. हमीर यांना न्याय मिळेलच परंतु ईचलानचा ही गोंधळ होऊ शकतो ही बाब स्पष्ट झाली आहे.

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )