खाडीपुलावर कारला आग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

नवी मुंबई - सायन-पनवेल महामार्गावरून मुंबईहून पनवेलकडे जाणाऱ्या कारला बुधवारी (ता. ९) रात्री ८.३० च्या सुमारास वाशी खाडीपुलावर आग लागली. त्यात ती जळून खाक झाली. सुदैवाने कारमधील चौघे जण उतरल्यामुळे ते वाचले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी कारला लागलेली आग विझवली. त्यामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक बंद झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

मुंबईहून निघालेली कार वाशी खाडीपुलावर आली, तेव्हा कारमधून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला. हा प्रकार कारचालकाच्या लक्षात येताच त्याने कार रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर ते चौघे खाली उतरले. नंतर काही वेळातच कार पेटली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी ती विझवली. या घटनेमुळे पुण्याकडे जाणारी हलक्‍या वाहनांची वाहतूक जुन्या खाडीपुलावरून वळवली होती. जळालेली कार बाजूला हटवल्यानंतर येथील वाहतूक पुन्हा सुरू झाली, असे वाशी वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: Car fire on the bridge