कार-एसटी अपघातात चिमुकल्याचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

माणगाव-पुणे रस्त्यावर ताम्हाणी घाटातील वळणावर पुण्याहून आलेल्या फोर्ड आयकॉन कारची समोरून येत असलेल्या एसटी बसला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात कारमधील 3 वर्षांच्या बाळाचा मृत्यू झाला, तर त्याचे आई, वडिल व भाऊ असे तिघेजण जखमी झाले. शनिवारी (19 मे) सकाळी 8.45 च्या सुमारास हा अपघात घडला. 
 

माणगाव : माणगाव-पुणे रस्त्यावर ताम्हाणी घाटातील वळणावर पुण्याहून आलेल्या फोर्ड आयकॉन कारची समोरून येत असलेल्या एसटी बसला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात कारमधील 3 वर्षांच्या बाळाचा मृत्यू झाला, तर त्याचे आई, वडिल व भाऊ असे तिघेजण जखमी झाले. शनिवारी (19 मे) सकाळी 8.45 च्या सुमारास हा अपघात घडला. 

एसटी बसचालक अनिल राठोड यांनी या अपघाताची खबर माणगाव पोलिस ठाण्यात दिली. राठोड हे त्यांच्या ताब्यातील एसटी बस पुण्याकडे घेऊन जात होते. गाडी ताम्हाणी घाटातील एका वळणावर आली असता समोरून भरधाव आलेल्या कारची एसटीला जोरदार धडक बसली. या अपघातात श्रवण संतोष नागापुरे (3) या चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर त्याचे वडील व कारचालक संतोष प्रकाश नागापुरे (35), आई नीलम नागापुरे (28), भाऊ श्रेयश (6) हे तिघे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक प्रियंका बुरुंगळे करत आहेत. 

Web Title: car-ST accident