डहाणू समुद्रकिनारी आढळला मृत व्हेल मासा

whale
whale

डहाणू (वार्ताहर) : डहाणू  समुद्रकिनाऱ्यावर महाकाय ब्ल्यु व्हेल अर्थात निळा देवमासा मृतावस्थेत आढळून आला. सागरी प्रदूषणामुळे हा मृत झाला असल्याचे म्हटले जात आहे. मागील काही वर्षात या सस्तन प्राण्यांच्या मृत्यूचे वाढलेले प्रमाण चिंताजनक आहे.  

मृत देवमासा वाहून येणे ही सामान्य गोष्ट नाही, असे मत प्रकल्प संशोधक प्राची हटकट यांनी व्यक्त केले आहे. हा महाकाय व्हेल सुमारे 40 ते 45 फूट लांब 10 फूट रुंद होता. माशाचे मृत शरीर कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची प्रजाती ओळखणे शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. मृत माशाला किनाऱ्यालगतच जेसीबीने खड्डा खोदून  दफन करण्यात आले. 

दरवर्षी वाढत्या सागरी प्रदूषणामुळे ब्ल्यु व्हेल, डॉल्फिन, समुद्री कासवे व जलचर यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. जलचरांमुळे समुद्र साखळी प्रक्रिया व समुद्र स्वच्छता राखण्यास मदत होते.या जलचरांच्या घटत्या संख्येमुळे सागरी विनाश ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
- धवल कंसारा, वन्यजीव रक्षक, महाराष्ट्र राज्य वन विभाग, पालघर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com