वज्रेश्वरी देवस्थानच्या भ्रष्टाचार प्रकरणी ग्रामस्थांकडून कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

वज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी येथील सुप्रसिद्ध देवस्थान वज्रेश्वरी योगीनीदेवी संस्थानमध्ये नुकताच 3 करोड 22 लाख 85हजार 658 रुपयाच्या अपहर झाल्याचे समोर आले. वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि अकलोली सह संपूर्ण ठाणे जिल्हात यामुळे संतापाची लाट आहे. येथील ग्रामस्थांनी व भक्तगणांनी विविध स्तरावर तीव्र निषेध नोंदवित आज कडकडीत बंद पाळला असून तसे निषेधाचे फलक देखील गावात लावण्यात आलेले आहेत.

वज्रेश्वरी या योगिनी देवी संस्थे वर वज्रेश्वरी येथील अविनाश राऊत, गावपरिसरातील कल्पेश पाटील, व परंपरागत विश्वस्त अनिता गोसावी हे तिघे विश्वस्त स्थानिक रहिवाशी आहेत. असे असताना देखील एवढा मोठा अपहार झालाच कसा? असा संतप्त सवाल येथील व ग्रामस्थांनी केला. येथील विश्वस्त मंडळाची कसून चौकशी करण्यात यावी व सवा कोटी रुपयांचा अपहार करणाऱया मनोज प्रधान याला तातडीने अटक करावी व त्यास कठोर शिक्षा व्हावी या याच्या निषेधारधत आज वज्रेश्वरीत ग्रामस्थांनी स्वयंफुरती आपली दुकाने बंद करून कडकडीत बंद पाळला. 

देवस्थानच्या जमिनींची विक्री, दानपेटी, दागिने, साडी चोळी, नारळ, आणि शारदीय व चैत्र नवरात्रोत्सवात होणारा खर्च आदि विषयी देखील सखोल चौकशी करून यातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी भाविकांमधून कऱण्यात आली, यावेळी स्थानिक महिला भक्तगणांनी आपल्या मनोगतात "देवस्थानच्या विश्वस्त मंडळ कडून सुरू असलेल्या अरे रावी व मनमानी कारभाराचे पाढे वाचण्यात आले. तसेच जिल्यातील काही जेष्ठ देवी भक्तांनी विद्यमान विश्वस्त कडून देवस्थान मालमत्तेची कशा प्रकारे विल्हेवाट लावली जात आहे याची माहिती दिली. 

या बंदमध्ये गावातील फुलहार विक्रेते, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, व परिसरातील देवी भक्त व ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी होऊन कडकडीत बंद यशस्वी करण्यात आला. तर या बंदमध्ये जिल्यातील मोठ्या संख्येने आलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी पिण्याची पाणी व अल्पोहारची व्यवस्था येथील स्वामी समर्थ हॉटेल आणि संघर्ष अभियान या संस्थेने केली. यावेळी गणेशपुरी पोलीस ठाणे मार्फ़त कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला.

Web Title: In the case of corruption of Vajreshwari temple, the people did agitation