तरुणाच्या मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

दिनेश गोगी
सोमवार, 17 डिसेंबर 2018

उल्हासनगर : दोनशे रुपयांच्या मोबदल्यात गुरुनानक शाळेने जुने फ्लेक्सबॅनर काढण्याचे काम दिलेल्या प्रमोद पंडित या 18 वर्षीय तरुणाचा शॉक लागून तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली होती. शाळा प्रशासन, मुख्याध्यापिका, पालिकेचे संबंधित अधिकारी व विद्युत वितरण महामंडळावर ठपका ठेवण्यात आला असून त्यांच्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

प्रमोद पंडित हा शनिवारी सकाळी गुरुनानक शाळेच्या इमारतीवर लावलेला जुना फ्लेक्सबॅनर काढण्यासाठी गेला होता. जुना काढून नवीन फ्लेक्सबॅनर लावण्याकरिता शाळेच्यावतीने प्रमोदला व त्याच्या मित्राला प्रत्येकी दोनशे रुपये देणार होती. मात्र इमारतीच्या बाजूला असलेल्या विद्युत तारेचा प्रमोदला जबरदस्त धक्का बसल्याने तो तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रमोदचे वडील भगवान पंडित यांच्या तक्रारीवरून गुरुनानक शाळा चालवणारे पंजाब सेवक सभा संस्थेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, गुरुनानक हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज च्या मुख्याध्यापिका रिना शिवकुमार, शिक्षक धीरज पुतनानी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ, उल्हासनगर महानगरपालिकेचे संबंधीत अधिकारी यांचे वर भादवी 304(ब), 34 प्रमाणे विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुकाराम शेळके करत आहेत.

दोनशे रूपयांसाठी गमावला जीव; फ्लेक्सबॅनर काढताना मृत्यू

Web Title: In case of the death of a youth, a complaint of homicide was filed