झाड कत्तलीच्या गुन्हाची नोंद, कायद्याने वागा चा दणका

दिनेश गोगी
शनिवार, 14 जुलै 2018

उल्हासनगर : अनधिकृत बांधकाम करण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या मोठ्या झाडाची निर्दयपणे कत्तल करण्याचा प्रकार मिठाई विक्रेत्या व्यापाऱ्याच्या अंगलट आला आहे. उल्हासनगरातील कायद्याने वागा लोकचळवळीने या प्रकाराला चव्हाट्यावर आणल्यावर प्रभाग 3 चे साहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. झाड कत्तलीचा गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने अनधिकृत बांधकामांसाठी झाडांच्या कत्तली करणाऱ्यांनो सावधान असे संकेत देण्याची वेळ आली आहे.

कॅम्प नंबर 3 मधील शिवाजी चौकात ए-वन स्वीटस् हे मिठाईचे मोठे दुकान आहे. दुकानाच्या मागील जागेत अनधिकृत बांधकाम करण्याच्या उद्देशाने पूर्ण वाढ झालेल्या झाडाची कत्तल रमेश लोकवानी यांनी केली. 14 जून रोजी केलेल्या झाडाच्या कत्तलीच्या प्रकाराची कायद्याने वागा लोकचळवळीचे सर्वेसर्वा राज असरोंडकर यांच्या निर्देशान्वये माध्यम समन्वयक प्रफुल केदारे यांनी पालिका आणि पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. तसेच आपले सरकार या वेब पोर्टलमार्फत शासनाकडेही दाद मागितली होती.

शेवटी या तक्रारी नुसार खातरजमा केल्यावर आयुक्त गणेश पाटील, मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर यांच्या आदेशान्वये  सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी वृक्ष जतन व संरक्षण अधिनियमातील कलम 21 अंतर्गत मध्यवर्ती पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यावर रमेश लोकवानी यांच्यावर गुन्ह्याची नोंद झाली आहे. सदर जागेवर झालेले ए-वन स्वीटस् लगतचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करून, तसंच मोकळ्या जागेवर सुरू असलेले अतिरिक्त बांधकाम थांबवून महानगरपालिकेने तिथे वृक्षारोपण करावे, या मागणीसाठी आता कायद्याने वागा लोकचळवळ पाठपुरावा करणार असल्याचे राज असरोंडकर यांनी सांगितले.

Web Title: case register of tree cutting