पोलिस कारवाईचे मोबाईलवर चित्रीकरण पडले महागात, तरूणावर गुन्हा दाखल

पोलिस कारवाईचे मोबाईलवर चित्रीकरण पडले महागात, तरूणावर गुन्हा दाखल

मुंबई : पोलिस कारवाई दरम्यान चित्रीकरण करणे एका तरुणाच्या भलतेच अंगाशी आले. याप्रकरणी वडाळा पोलिसांनी गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी  तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तरुणाला मास्क न घातला दुचाकी चालवत असताना नाकाबंदीमध्ये पकडण्यात आले होते. ३१ वर्षीय मुकेश अतर सिंग या तरुणाविरोधात भादंवि कलम 188, 269,270 सह शासकीय गुपिते अधिनियम 1923 कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडाला पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई आनंदा खाडे यांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात तक्रारीनुसार, 17 सप्टेंबरला वडाळा पोलिस ठाण्यातील पोलिस पथक वडाळा ब्रीज येथे नाकाबंदीला तैनात होते. माटुंग्याच्या दिशेने एक दुचाकी डबल सीट येत असताना पोलिस पथकाला दिसली. त्याच्या चेह-यावर मास्क नसल्यामुळे पोलिसांनी त्याला थांबवले आणि चालक परवाना विचारला असता त्याच्याकडे परवानाही नव्हता. चालकाला नाव विचारले अशता त्याने मुकेश सिंग असल्याचे सांगितले. त्याच्या पाठीमागे मनोज शुक्ला   नावाचा तरूण बसला होता. त्यांना घेऊन पोलिस वडाळा पोलिस ठाण्यात आले.

पोलिस शिपाई आनंद खाडे याप्रकरणी तक्रार नोंदवत असताना हा तरूण व्हिडीओ चित्रीकरण करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्याकडील मोबाईल पंचांसमक्ष ताब्यात घेऊन पाहणी केली असता त्यात कारवाई करत असताना पोलिस अंमलदार कक्षाचे चित्रीकरण आढळले. त्यामुळे सरकारी कामाच्या गोपनीयतेचा भंग गेल्याप्रकरणी सिंगविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

( संपादन - सुमित बागुल )

case registered on a youngster for recording police action in personal mobile  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com