खाऊच्या गाड्या होताहेत कॅशलेस 

रश्‍मी पाटील - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

ठाणे - नोटबंदी झाल्यामुळे बाजारात मंदीसदृश परिस्थिती आहे. हातात आहेत ते पैसे सांभाळून वापरत गरजेच्याच गोष्टी खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल आहे. सुटे मिळत नसल्याने ग्राहक क्रेडिट-डेबिटसोबतच पेटीएमचा वापर करत आहेत. 

ठाणे - नोटबंदी झाल्यामुळे बाजारात मंदीसदृश परिस्थिती आहे. हातात आहेत ते पैसे सांभाळून वापरत गरजेच्याच गोष्टी खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल आहे. सुटे मिळत नसल्याने ग्राहक क्रेडिट-डेबिटसोबतच पेटीएमचा वापर करत आहेत. 

ठाण्यातील फटका गल्लीतील अनिल खिमापाववाल्याने आपल्या गाडीवर पेटीएमने पैसे घेण्यास सुरुवात केल्यामुळे ग्राहकांची पावले त्यांच्याकडे वळू लागली आहेत. अशा पद्धतीने पेटीएमचा वापर करणारी ठाण्यातील ही पहिलीच गाडी ठरली आहे. नोटबंदीमुळे ग्राहक कमी झाले होते. सुट्यांचा तुटवडा असल्याने ग्राहक यायचे; परंतु काही न खाता जायचे. पाच दिवसांपूर्वी पेटीएम ऍप घेतला. स्थानिक नगरसेवकानेही यासाठी प्रोत्साहन दिले आहे. "येथे पेटीएमने पैसे स्वीकारले जातील' असा फलक लावला. अद्याप ही संकल्पना फारशी माहिती नसल्याने ग्राहक पेटीएमने पैसे कसे भरायचे, याची चौकशी करायलाही येतात. खिमापावसोबत ऍप डाऊनलोड कसे करायचे, याची माहिती देतो. आता काही ग्राहक स्वतःहून पेटीएमने पेमेंट देत आहेत, असे अनिल पंजवानी यांनी सांगितले. अशाप्रकारे ठाण्यातील मुख्य मच्छी मार्केटमध्ये एका मासे विक्रेत्याने डेबिट कार्ड मशीनच्या माध्यमातून पैसे घेण्यास सुरुवात करणार असल्याची माहिती दिली. 

सुरुवातीला ऍप प्रकरण जरा कठीण वाटले होते; मात्र आता ग्राहकांमध्ये जागृती होत आहे. 
- अनिल पंजवानी 

Web Title: cashless food stall