कॅशलेस आरोग्य योजना शिक्षकांना लागू करा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

मुंबई ः राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य योजना तातडीने लागू करावी, अशी मागणी शिक्षक परिषदेचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.

मुंबई ः राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य योजना तातडीने लागू करावी, अशी मागणी शिक्षक परिषदेचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.

गेल्या वर्षी शिक्षक दिनी ठाणे येथील राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात शिक्षकांना कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याची घोषणा तावडे यांनी केली होती. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती जमवली; परंतु अजूनही ही योजना लागू केलेली नाही. सरकारमान्य अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतरांची वैद्यकीय बिले एका महिन्यात मंजूर करावी, असे आदेश देण्यात आले होते. शिक्षकांची वैद्यकीय बिले वेळेवर मंजूर होत नाहीत, असे निदर्शनास आल्याने शिक्षकांनी कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याची मागणी केली; परंतु त्याबाबत राज्य सरकार थंड असल्याचे बोरनारे यांनी सांगितले.

Web Title: cashless health scheme for teachers