एसटीत दीड महिन्यात 31 लाखांचे कॅशलेस व्यवहार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

मुंबई - नोटाबंदीनंतर एसटी महामंडळाने मुंबईसह राज्यातील प्रमुख बस स्थानकांतील आरक्षण केंद्रावर बसवलेल्या स्वाइप मशिनला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दीड महिन्यात एसटीच्या प्रवाशांनी सुमारे 31 लाख रुपयांच्या तिकिटांचे व्यवहार कॅशलेस केले आहेत.

कॅशलेस व्यवहार करण्यासाठी एसटी महामंडळाने प्रमुख बस स्थानकांतील आरक्षण केंद्रांवर स्वाइप मशिन बसवण्याचा निर्णय घेतला होता. दीड महिन्यापासून मुंबईसह औंरगाबाद, जालना, कोल्हापूर, रायगड, सांगली व पुणे विभागांत स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बॅंकेची स्वाइप मशिन बसवण्यात आली. प्रमुख आगारांमधील स्वाइप मशिनची संख्या 71 वर पोचली आहे. त्याला प्रवाशांचा प्रतिसाद मिळू लागला आहे. एसटीच्या 30 आगारांतील संगणकीय आरक्षण केंद्रावर दीड महिन्यात स्वाइप मशिनद्वारे 31 लाख रुपयांची तिकिटं खरेदी झाल्याची प्राथमिक माहिती महामंडळातील सूत्रांनी दिली. इतर विभागांतून आकडेवारी घेण्याचे काम सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: cashless transaction in st depo