कॅशलेस यंग इंडिया

कॅशलेस यंग इंडिया

मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यावर कॅशलेस व्यवहाराकडे वळा, असे आवाहन केले. डिजिटल बॅंकिंगच्या सुविधेचा वापर करा, असेही म्हटले. भारताला आता सद्यस्थितीच्या आव्हानांना तोंड देऊन कॅशलेसच्या दृष्टीने पावलं टाकणं शक्‍य होणार आहे का? आपला देश कॅशलेस होण्यासाठी सक्षम आहे का? ऑनलाईन व्यवहार करणं सोपं आहे की कठीण. आणि सुरक्षेचं काय? आजच्या तरुणाईला काय वाटतं? 

नोटाबंदीमुळे खिशात पैशांची जागा डेबिट कार्डने घेतली व मोबाईलमध्ये गेम्सच्या जागी पेटीएम ॲप डाऊनलोड केलंय. सरकारने नोटाबंदी केली; पण बऱ्याच वेगवेगळ्या सोई उपलब्ध करून दिल्या आहेत. अगदी साध्या फोनमध्येसुद्धा या सोई उपलब्ध आहेत. अशा वेळी तक्रार करण्याऐवजी दिलेल्या सुविधांचा वापर करावा.       
- सूरज पाटील (रायगड पालकमंत्री, यिन मंत्रिमंडळ)

भारतात पहिल्यांदा नोटाबंदीचा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. याला माझाही पाठिंबा आहे. पैशांच्या व्यवहारासाठी पैशांचीच गरज नसते. आता सद्यस्थितीला तंत्रज्ञानात जे बदल होताहेत, ते स्वीकारून उपलब्ध सोईंचा पुरेपूर वापर केला तर नक्कीच येत्या काळात आपल्याला फायदा होणार आहे.                                             
- आकाश गडगे (यिन जिल्हाध्यक्ष, ठाणे)

नोटाबंदीने भारतातील बहुतांश लोकांच्या मनात नकारात्मक विचार आणले आहेत. पण या सगळ्या नकारात्मक गोष्टी एका बाजूला ठेवल्या, तर हे आपल्या हितासाठीच आहे आणि या गोष्टीला त्रासदायक न समजता आपण वेगवेगळे पर्याय वापरला हवेत. लेट्‌स ट्राय इट !                       
- कल्पेश कऊळे (यिन जिल्हाध्यक्ष, ठाणे)

नोटाबंदीने सुरुवातीचे काही दिवस प्रत्येक कामावर बंदी लावली. परंतु खऱ्या अर्थाने डिजिटल इंडियाचे रूप याचदरम्यान दिसून आले. पेटीएम असो, फ्रीचार्ज असो किंवा डेबिट कार्ड पेमेंट... सगळे लोक मनीलेस व्यवहाराकडे वळत आहेत. त्यामुळे आधीचे काही दिवस त्रासदायक ठरले; पण सध्याची सिच्युएशन कूल आहे.   
- अल्फीया छापेकर (महिला व बाल विकासमंत्री, यिन मंत्रिमंडळ)

नोटाबंदीमुळे देशातील प्रत्येक युवकाच्या आयुष्यामध्ये एक वेगळे धोरण आले आहे ते म्हणजे सुट्टे पैसे जपून वापरायचे. हजारची नोट हरवली तरी चालेल; पण शंभर हरवायला नकोत. नोटाबंदीने प्रत्येक गोष्टीची किंमत पटवून दिली आहे.   
- क्रिष्णा नलावडे (मुंबई पालकमंत्री, यिन मंत्रिमंडळ)

चलनबदलानंतर देश कॅशलेस व्यवहारांकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे. कॅशलेस व्यवहार आधीदेखील होत होते; परंतु आता मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि कॅशलेस व्यवहार व्हावेत म्हणून सरकारकडूनही मोठा पाठिंबा दिला जात आहे. कॅशलेस व्यवहार हे शॉपिंग, प्रवास यासाठी मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरतात. शॉपिंग किंवा प्रवासामध्ये पैसे घेऊन वावरणे बऱ्याच वेळा धोक्‍याचे ठरते. परंतु व्यवहार ATM, DEBIT, CREDIT, MOBILE WALLET ने करणे हे चांगलेच आहे. कारण आपले कार्ड हरवले अथवा चोरीस गेल्यास आपण ते त्वरित ब्लॉक करून निकामी करू शकतो. कॅशलेस व्यवहारांसाठी सरकारने दोन हजारपर्यंतच्या व्यवहारांचा सेवा कर रद्द केला आहे; तसेच सेवा कर, रेल्वे तिकीट, टोल यावरही सवलती मिळत आहेत. कॅशलेस, ऑनलाईन व्यवहारांमुळे मोठ्या प्रमाणात सूट मिळून फायदाच होत असतो. परंतु अजूनही  fake mails, hacking यामुळे कॅशलेस व्यवहारांबाबत मोठी भीती आहे.
- धनश्री अंकुश साळुंखे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com