जातीनुसार आरक्षणाची आणखी काही वर्षे गरज- मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

मुंबई - शिक्षण क्षेत्रात स्वातंत्र्योत्तर काळानंतर बौद्धिक निकषांऐवजी जातीनुसार आरक्षणाला प्राधान्य दिले जात आहे. ही स्थिती कायम असली तरी त्याची आणखी काही वर्षे गरज आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. आयआयटीतील "मूड इण्डिगो' या कार्यक्रमातील चर्चासत्रात ते बोलत होते. या वेळी "ट्रान्स्फॉर्म महाराष्ट्र' या संकेतस्थळाचे उद्‌घाटनही करण्यात आले. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. गोस्वामी यांनी स्त्री-पुरुष समानतेसह अनेक महत्त्वाच्या घटनांवर प्रश्‍न विचारले. शिक्षणातील आरक्षणाबाबत गोस्वामी यांनी खेद व्यक्त केला. विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता डावलून केवळ जातीनुसार आरक्षण मिळाल्याने असंख्य विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, असे म्हणत गोस्वामी यांनी मुख्यमंत्र्यांचे आरक्षणाबाबतचे मत विचारले असता मुख्यमंत्र्यांनी जातीनिहाय आरक्षणाला पाठिंबा दिला. आणखी काही वर्षे विविध क्षेत्रांत काही जातींना पुढे आणण्यासाठी आरक्षण आवश्‍यकच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. योजनेनुसार काम झाले तर आरक्षणाची झळ बसणार नाही असे सांगत, महाविद्यालयांतील विद्यार्थिक्षमता वाढवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. आयआयटीसारख्या अनेक शिक्षणसंस्थांचे जाळे विविध भागांत पसरल्यास शैक्षणिक आरक्षणाच्या समस्येचा फटका बसणार नाही, असे ते म्हणाले. 

पंतप्रधानपद नको रे बाबा! 
राजकीय फळीतील अनेक नामवंत आणि ज्येष्ठ राजकारण्यांना पंतप्रधान होण्याची लालसा आहे; परंतु आजवर ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत. हे त्यांचे स्वप्नच बनून राहिल्याने मलाही पंतप्रधान बनण्याची अजिबात इच्छा नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिस्कीलपणे म्हणाले. शरद पवार, लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग यांची ही इच्छा पूर्ण न झाल्याने मी याचा विचार न केलेलाच बरा, अशी टिप्पणी त्यांनी केली. 

Web Title: caste reservation need for a few years