बच्चे कंपनीचा हिरमोड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

बेलापूर - सीबीडी सेक्‍टर ८ मधील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण होऊनही त्याचे उद्‌घाटन अद्याप झाले नाही. उद्‌घाटन न झाल्यामुळे नागरिकांसाठी ते खुले करण्यात आले नाही. परीक्षा संपल्यानंतरही खेळण्यास मिळत नसल्यामुळे बच्चेकंपनीचा मात्र हिरमोड झाला आहे.

नवी मुंबई उद्यानांचे शहर म्हणून ओळखले जाते. विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने शहरातील उद्याने मुले आणि नागरिकांनी गजबजली आहेत. सीबीडी सेक्‍टर ८ मधील आर्टिस्ट कॉलनी जवळील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाच्या डागडुजीचे काम झाले आहे; परंतु उद्‌घाटन न झाल्याने ते संबंधित विभागाने बंद ठेवले आहे. त्यामुळे आर्टिस्ट कॉलनी परिसरातील नागरिकांना आणि लहान मुलांना उद्यान असूनही त्याचा फायदा घेता येत नाही. या उद्यानाच्या आतील भागात नागरिकांसाठी बांधलेले सिमेंटच्या कट्ट्यांवरील सिमेंट निघाले आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वाराची कमान उकलली आहे. उद्‌घाटनाआधीच झालेल्या उद्यानाच्या या दुरवस्थेमुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्‍न निर्माण झाला आहे. असे असले तरी पालिकेने हे उद्यान लवकर खुले करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

उद्यानाच्या आतील भागात लॉन आहे. तेथील गवत वाढून ती हिरवीगार होईपर्यंत उद्यान बंद ठेवले आहे. आताच उद्यान खुले केल्यास नागरिक त्यावरून चालतील त्यामुळे हिरवळ नष्ट होण्याची भीती आहे. उद्यानाची कमान आणि बसण्याच्या कट्ट्यांबाबत संबंधित विभागाला कळवले जाईल आणि त्यांची दुरुस्ती केली जाईल.
- प्रकाश गिरी, उद्यान अधीक्षक 

Web Title: CBD section 8 garden