सीबीआय चौकशीत अनिल देशमुखांनी आरोप फेटाळले

इतर अधिका-यांनाही अशा प्रकारे टार्गेट देण्यात आले होते का?
Anil deshmukh
Anil deshmukhFile photo

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) समन्स बजावले होते. त्यानुसार बुधवारी नऊ तासांहून अधिक काळ त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्यावर पोलीस अधिकाऱ्यांना खंडणी वसूल करण्याचे आदेश दिल्याचा आरोप आहे. याबाबत सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. या आरोपामुळेच देशमुखांना मंत्रिपद सोडावे लागले होते.

या चौकशीवेळी सिंग यांच्या आरोपांबाबत देशमुख यांना प्रश्न विचारण्यात आले. तसेच वाझेला वसुलीसाठी टार्गेट देण्यात आले होते का? याबाबतही विचारणा करण्यात आली. इतर अधिका-यांनाही अशा प्रकारे टार्गेट देण्यात आले होते का? याबाबत कोणाचा दबाव होता का?आदी आरोपांबाबत विचारणा करण्यात आली.

दरम्यान, देशमुख यांनी बहुतांश आरोप फेटाळले. यावेळी आरोप तथ्यहीन आणि चुकीचे असल्याचा देशमुखांचा दावा चौकशीत केला. परमबीर सिंग यांची बदली केल्याने त्यांनी पत्र लिहल्याचेही त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. उपायुक्त राजू भुजबळ आणि एसीपी संजय पाटील यांनी त्यांच्या जबाबात देखमुख यांनी त्यांना कोणतिही वसुली करायला सांगितली नसल्याचे स्पष्ट केले होते.

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे सीआययूचे प्रभारी होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे.

पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते.

(संपादन - दीनानाथ परब)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com