'संदीपसिंह आणि भाजपच्या संबधांबाबत चौकशी करण्याची सीबीआयला विनंती'; गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती

तुषार सोनवणे
Monday, 31 August 2020

संदीपसिंह प्रकरणी कॉंग्रेसच्या शिष्ठमंडळाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली आणि याबाबत चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर अनिल देशमुख यांनी प्रतिक्रीया दिली.

मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणात रोज वेगवेगळ्या बाबी समोर येत आहेत. त्यात राजकीय प्रतिनिधीनी उडी घेतल्या नंतर या प्रकरणाची आता जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणात चौकशीच्या कक्षेत असलेल्या संदिपसिंह या तरुणाची आणि भाजपच्या नेत्यांच्या संबधांचा तपास करण्याची मागणी कॉंग्रेसने केली होती. याप्रकरणी आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

लॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वे ठरली जीवनवाहिनी; 11,400 टन जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय तपास करत आहे. याप्रकरणी आता राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरु झालेत. 'सुशांतसिंग प्रकरणाशी जोडला गेलेला संदीपसिंह आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील घनिष्ट संबंध आता उघड होताहेत. या संदिप सिंहनं भाजप कार्यालयाशी तब्बल 53 वेळा फोन केले असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे'.

 ती खरी असल्यास भाजपा कार्यालयातील ‘तो’ बॉस कोण आणि भाजपाची संदीप सिंहशी एवढी जवळीक कशी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत, अशी मागणी सचिन सावंत यांच्याकडून करण्यात आली आहे.या प्रकरणी कॉंग्रेसच्या शिष्ठमंडळाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली आणि याबाबत चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर अनिल देशमुख यांनी प्रतिक्रीया दिली.

 

 

 गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज कॉंग्रेस शिष्ठमंडळाची मागणीसंदर्भात चौकशी करण्याची विनंती सीबीआयला केली असल्याची माहिती दिली आहे. आता संदिपच्या चौकशीच्या मुद्द्यावर कॉंग्रेस आणि भाजप आमनेसामने येणार हे नक्की.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CBI requested to probe Sandeep Singh-BJP relationship; Demand of Home Minister Anil Deshmukh