सीबीएसई प्रश्‍नपत्रिका फुटल्याच्या अफवा 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 एप्रिल 2018

मुंबई - सीबीएसई बोर्डाच्या तीन प्रश्‍नपत्रिका सोशल नेटवर्किंग साईट्‌सवर व्हायरल झाल्याची चर्चा शनिवारी मध्यरात्रीपर्यंत सुरू होती; मात्र या प्रश्‍नपत्रिका गतवर्षीच्या असल्याचे बोर्डाने मध्यरात्री तातडीने खुलासा केला. त्यानंतरही आज दिवसात तीन प्रश्‍नपत्रिका फुटल्याची चर्चा सुरूच राहिल्याने सीबीएसई बोर्ड चांगलेच हैराण झाले. 

शनिवारी दुपारी बारावीच्या हिंदी विषयाची प्रश्‍नपत्रिका व्हॉट्‌सऍप आणि यू ट्युबवर आली होती. याबाबत समजताच सीबीएसई बोर्डाने ती प्रश्‍नपत्रिका या वर्षाची नसल्याचे स्पष्ट केले. व्हायरल झालेली ही प्रश्‍नपत्रिका बनावट असल्याचा दावा सीबीएसईने केला. रात्री बारावीची विज्ञान विषयाची प्रश्‍नपत्रिका यू ट्युबवर आली. ही प्रश्‍नपत्रिका गतवर्षीची असल्याचे त्वरित सीबीएसईने प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले. बारावीपाठोपाठ दहावीची प्रश्‍नपत्रिकाही यू ट्युबवर झळकल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. दहावीची गतवर्षीची संस्कृत विषयाची प्रश्‍नपत्रिका यू ट्युबवर प्रसिद्ध झाल्याचे सीबीएसई बोर्डाने मध्यरात्री त्वरित स्पष्ट केले. सोशल नेटवर्किंग, साईटवर व्हायरल होणाऱ्या प्रश्‍नपत्रिकांवर विश्‍वास ठेवू नका. सोशल नेटवर्किंग साईटवरील प्रश्‍नपत्रिका जुन्या किंवा खोट्या असल्याचे सीबीएसई बोर्डाने स्पष्ट केले. 

Web Title: CBSE exam paper leak rumors