'सीबीएसई'च्या विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षा देऊ नये : राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

मुंबई : 'प्रश्‍नपत्रिका फुटल्या हा मुळात सरकारचा हलगर्जीपणा आहे. स्वत:ची चूक मान्य करायचे सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा कसल्या द्यायला लावत आहात' अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शुक्रवार) सरकारवर टीका केली. 'सीबीएसई'चे दोन पेपर फुटल्यामुळे या विषयांच्या परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर देशभरातून त्याविरोधात टीकेचा सूर उमटला आहे. राज ठाकरे यांनीही आज आपली भूमिका स्पष्ट केली. 

'देशभरातील पालकांना माझे आवाहन आहे, की कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुलांना फेरपरीक्षेस बसवू नका. तुम्ही झुकताय, हे सरकारच्या लक्षात आले, की ते तुम्हाला अजून वाकवण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही निर्णयावर ठाम राहा; सरकारला जो काही निर्णय घ्यायचा असेल, तो घेऊ दे', असे आवाहन ठाकरे यांनी केले. 

"प्रश्‍नपत्रिका फुटल्या ही सरकारची चूक आहे. ही चूक सुधारायची किंवा मान्य करण्याऐवजी फेरपरीक्षा घेतली जात आहे. सरकारला प्रश्‍नपत्रिकांची गोपनीयता राखता येत नसेल, तर त्यात विद्यार्थ्यांचा काय दोष? त्यांनी पुन्हा परीक्षा का द्यायची? महाराष्ट्र नवनिर्माण सेना देशभरातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या पाठीशी ठामपणे उभी असेल', असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. 

Web Title: CBSE students should not appear for re-examination in CBSE Paper Leak case, says Raj Thackray