ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयाला सीसी टीव्ही कवच 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

वाशी - येथील सार्वजनिक रुग्णालयांप्रमाणेच ऐरोली व नेरूळ येथील रुग्णालये आरोग्य सुविधांसह सक्षम करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी गतिमान पावले उचलली आहेत. आवश्‍यक रुग्णालयीन साहित्य, औषधपुरवठ्यासह येथील सुरक्षिततेवर बारकाईने लक्ष देण्यासाठी सीसी टीव्हीचे कवच सेक्‍टर- 3, ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयाला देण्यास मंजुरी दिली आहे. 

सीसी टीव्ही यंत्रणा उभारणीसाठी 25 लाख 13 हजार रुपयांच्या कामाचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे प्रशासकीय मंजुरीसाठी सादर केला जात आहे. मंजुरीनंतर रीतसर निविदा प्रक्रिया राबवून ऐरोली रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर सीसी टीव्हीच्या तिसऱ्या डोळ्याची बारीक नजर असणार आहे. 

प्रस्तावानुसार पाच मजली राजमाता जिजाऊ रुग्णालयात 50 हून अधिक सीसी टीव्ही व अनुषंगिक यंत्रणा बसवली जाईल. यानंतर रुग्णालयीन सेवा-सुविधा, विविध साहित्य, फर्निचर; तसेच रुग्णांना अधिक सुरक्षितता लाभणार आहे. याद्वारे रुग्णालयात कार्यरत सुरक्षा यंत्रणेला रुग्णालयात ये-जा करणाऱ्या व्यक्तींवर सीसी टीव्ही यंत्रणेद्वारे सूक्ष्म नजर ठेवता येईल. त्याशिवाय रुग्णालयाच्या विभागप्रमुखांनाही रुग्णालयातील अधिकारी - कर्मचारीवृंदाच्या कामावर प्रशासकीयदृष्ट्या सनियंत्रण ठेवण्यास मोलाची मदत होईल. मा. न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक प्रसूती कक्षात व प्रसूतीपश्‍चात कक्षामध्ये सीसी टीव्ही यंत्रणा असणे बंधनकारक आहे. त्याचेही पालन याद्वारे केले जाणार आहे. रुग्णांचे नातेवाईक व इतर व्यक्तींकडून रुग्णालयीन मालमत्तेचे नुकसान होत असेल, तर त्यावरही निरीक्षण व नियंत्रण ठेवणे याद्वारे शक्‍य होणार आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयामध्ये काही अघटित घटना घडल्यास तपासासाठी सीसी टीव्ही यंत्रणेचा आधार घेता येईल. 

Web Title: CC TV camera Rajmata Jijau Hospital in Airli