सीसी टीव्ही कॅमेऱ्यांबाबत सरकारचे मार्गदर्शक धोरण

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 जानेवारी 2017

मुंबई - सार्वजनिक सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, अतिरेक्‍याच्या कारवायांना आळा घालणे आणि धार्मिक कार्यक्रम व मिरवणुकांवर नजर ठेवण्यासाठी शहरातील मोक्‍याच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत सरकारने एक मार्गदर्शक धोरण तयार केले आहे.

या धोरणात सीसी टीव्ही बसवण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश आहे. पोलिस वाहतूक विभाग आणि महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद यांच्या गरजा विचारात घेऊन पोलिस आयुक्‍त, पोलिस अधीक्षक कॅमेरे बसवण्याची ठिकाणे निश्‍चित करतील. अती वर्दळीची सार्वजनिक ठिकाणे, प्रमुख वाहतूक जंक्‍शन, गुन्हे घडण्याची शक्‍यता असलेली ठिकाणे, धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे, धार्मिक मिरवणुकीचे मार्ग, उड्डाणपूल, पूल, वीजनिर्मिती केंद्रे व वितरणाची ठिकाणी, धरणे, पाणीपुरवठा, पंप केंद्रे, जलशुद्धीकरण यंत्रे, समाजसुधारक, विचारवंत, राजकीय नेते यांचे पुतळे आदी ठिकाणी सीसी टीव्ही बसवण्यात येणार आहेत. बस आगारे, रेल्वेस्थानके, विमानतळ, मॉल्स, रुग्णालये, हॉटेले यांची सीसी टीव्ही यंत्रणा सरकारी सीसी टीव्ही यंत्रणेशी जोडण्याचा विचार प्राधान्याने करण्यात येणार आहे.

Web Title: cctv camera government guidance policy