बेस्ट भाडे कपातीचे पेढे भरवून स्वागत

BEST
BEST

मुंबई : बेस्ट प्रशासनाने किमान भाडे 5 रुपये केल्याने मुंबईकर प्रवासी बेस्ट प्रशासनावर खुश झाला आहे.बेस्ट प्रवाशांसाठी मंगळवारपासून स्वस्त दरात प्रवास सुरू झाल्यामुळे बोरिवली-दहिसरमध्ये प्रवाश्यांनी पेढे वाटून बेस्टच स्वागत केले.

शिवसेना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मागणी नंतर बेस्ट समिती, पालिका सभागृह व राज्य सरकार प्राधिकरणाने या भाडे कपातीस मंजुरी दिली होती. त्यामुळे म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर व शिवसैनिकानी बोरिवली पश्चिममधील आय. सी. कॉलनी तसेच दहिसर कांदरपाडा भागात फटाक्यांची आतषबाजी करत या निर्णयाचे स्वागत केले.

याप्रसंगी कांदरपाडा येथून सुटणारी बस क्रमांक 245  मधील बेस्ट बसचालक, वाहक व प्रवाशांना गुलाबाचे फुल व पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आज सकाळपासूनच बोरिवली-दहिसर भागात प्रवाशांनी रिक्षाकडे पाठ फिरवत बेस्ट बस थांब्यांवर गर्दी केली होती.या निर्णयामुळे मुंबईकमधील प्रवाश्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com