सेलिब्रेटींचे "थर्टी फर्स्ट' परदेशात

सेलिब्रेटींचे "थर्टी फर्स्ट' परदेशात

मुंबई - नोटाबंदीचा फटका कलाकारांच्या थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनलाही बसला आहे. पंचतारांकित हॉटेलांत लाखोंचे मानधन घेऊन होणाऱ्या परफॉर्मन्सवर हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना पाणी सोडावे लागले आहे. कित्येक कलाकारांनी थर्टी फर्स्टची सुपारी न मिळाल्यामुळे आपल्या कुटुंबासमवेत थर्टी फर्स्ट परदेशात साजरा करण्याचे ठरवले आहे. काही ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते; पण तिकीट विक्री न झाल्यामुळे तेही रद्द करण्यात आले आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना काही मिनिटांसाठी चार ते पाच लाखांचे मानधन मिळत होते. मराठी कलाकारही विविध ठिकाणी हजेरी लावून चांगले पैसे मिळवत होते. यंदा हे चित्र बदलले आहे. नोटाबंदीमुळे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यंदा अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना मुलांसोबत दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे नववर्षाचे स्वागत करणार आहेत. बॉलिवूडची हॅपनिंग जोडी रणवीर-दीपिका दुबईला जाणार आहेत. अनुष्का शर्मा बॉयफ्रेंड विराट कोहलीसोबत डेहराडूनला जाणार आहे. अजय देवगण-काजोल या जोडीचा लंडनला जाण्याचा प्लॅन असल्याची चर्चा आहे. नवीन लव्हबर्डस्‌ आलिया आणि सिद्धार्थ आलियाच्या मुंबईतील घरीच नववर्षाचे स्वागत करतील.
कतरिना कैफ, बिपाशा बसू आदी कित्येक कलाकारांनी यापूर्वी थर्टी फर्स्टला पंचतारांकित हॉटेलांत कार्यक्रम केले आहेत. सनी लिओनला तिच्या "रईस' चित्रपटातील "लैला ओ लैला' या गाण्यावर थिरकण्यासाठी एका पंचतारांकित हॉटेलने एक-दोन नव्हे, तर चक्क चार कोटी रुपयांची ऑफर दिली होती; पण तिने नकार दिला. आपले मराठी कलाकारही फार ठिकाणी दिसणार नाहीत. मानसी नाईक नांदेडला नववर्ष स्वागताचा कार्यक्रम करणार आहे. मराठीतील बहुतेक कलाकार मुंबईबाहेर जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com