मध्य रेल्वेचे उद्‌घोषक 'भाडेतत्त्वावर'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

हार्बर आणि मुख्य मार्गावरील 41 स्थानकांवर आऊटसोर्सिंग
मुंबई - मध्य रेल्वेने 'आऊटसोर्सिंग'चा पर्याय स्वीकारत जवळपास 41 स्थानकांवरील उद्‌घोषणेची जबाबदारी खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांवर सोपवली आहे. "सी' दर्जाची ही स्थानके लहान असली प्रवाशांच्या वाढीव गर्दीमुळे दिवसाचे 24 तास लोकलच्या वेळापत्रकाची माहिती देण्यासाठी हा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

मध्य रेल्वेच्या काही लहान स्थानकांवर रात्री 10 वाजल्यानंतर इंडिकेटर बंद होणे किंवा लोकलची उद्‌घोषणा न होणे, हे प्रत्येकाने अनुभवले आहे. हार्बर मार्गावरील अनेक स्थानकांत ही गैरसोय मोठ्या प्रमाणात दिसून येते. रात्री लोकलची उद्‌घोषणा होत नाही, ही तक्रार प्रवासी संघटनांनी मध्य रेल्वेच्या प्रशासनाकडे केली होती. रात्रीच्या वेळेत रेल्वेचा कर्मचारीवर्गच नसल्याने लोकलची उद्‌घोषणा होत नव्हती. सध्या 35 स्थानकांवरच उद्‌घोषणा करण्यासाठी रेल्वेचा स्वत:चा कर्मचारीवर्ग आहे.

इतर स्थानकांवरही 24 तास उद्‌घोषणा व्हावी म्हणून 'आऊटसोर्सिंग'चा पर्याय रेल्वेने निवडला आहे. ऑक्‍टोबर 2016 पासून दोन वर्षांच्या करारावर एका कंपनीकडे मध्य रेल्वेच्या 41 स्थानकांवर उद्‌घोषणा करण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यात हार्बर मार्गावरील 19 आणि मुख्य मार्गावरील 22 स्थानकांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. या सुविधेमुळे प्रवाशांना प्रत्येक लोकलची उद्‌घोषणा ऐकायला मिळते. आऊटसोर्सिंगची पद्धत रेल्वेच्या इतर खात्यांतही वापरली जाते, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

या स्थानकांवर उद्‌घोषणा
हार्बर रेल्वेमार्ग

डॉकयार्ड रोड, रे रोड, किंग्ज सर्कल, जीटीबी नगर, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, जुईनगर, नेरूळ, शिवडी, खारघर, मानसरोवर, खांदेश्‍वर, ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे.

मुख्य मार्ग
मसजिद बंदर, चिंचपोकळी, करी रोड, सायन, विद्याविहार, कांजूर मार्ग, भांडुप, नाहूर, मुंब्रा, कोपर, कळवा, ठाकुर्ली, उल्हासनगर, टिटवाळा, वांगणी, नेरळ, खडवली, वासिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी, शेलू व भिवपुरी.

Web Title: central railway announcing on rental basis