दादर स्थानकावरून ये-जा करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी..

दादर स्थानकावरून ये-जा करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी..

मुंबईतील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक म्हणजे दादर स्थानक. मध्य आणि पश्चिम उपनगरातून ये जा करण्यासाठी दादर स्थानकात अत्यंत महत्त्वाचं. अशात मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 2 आणि 3 यांना जोडणाऱ्या जुन्या पादचारी पुलाच्या दुरुस्तीला पुन्हा सुरवात करण्यात येणार आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे या पुलाचा काही भाग बंद ठेवण्यात येणार आहे. 

सदर काम सुरु असताना या पुलावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांना मात्र कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेताना प्रशासन दिसतय. कारण मध्य रेल्वेवरील दादर स्थानकातील हा पादचारी पूल अशातः च बंद राहणार आहे. 

पुलाचं काम सुरु असताना पूलाच्या पायऱ्या आणि सरकते जिने बंद करण्यात येणार नाही. 23 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत चालणाऱ्या कामादरम्यान प्रवाशांनी अन्य पूलांचा वापर करावा, असं आवाहन  मध्य रेल्वेने केले आहे.

ये जा करण्याच्या दृष्टीने दादर हा केंद्रबिंदू आहे. अशात आता पावसाळ्यानंतर रेल्वेकडून धोकादायक पुलांचं काम सुरु केलं जातंय. टप्प्या टप्प्याने मुंबई मधल्या पुलांची काम केली जाणार आहेत.  

Webtitle : central railway dadar FOB will be repaired from 23rd November to 2nd December

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com