सिग्नल यंत्रणेत बिघाड; मध्य रेल्वे विस्कळित

मुंबई : परळ येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने प्रवाशांचा खुळंबा झाला. परळ स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती. (प्रथमेश गडकरी : सकाळ छायाचित्र सेवा)
मुंबई : परळ येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने प्रवाशांचा खुळंबा झाला. परळ स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती. (प्रथमेश गडकरी : सकाळ छायाचित्र सेवा)

मुंबई : दादर-परळ स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे आज (ता.16) मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली. परिणामी सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत होत्या.

मध्य रेल्वेचे बिघाडसत्र सुरू असतानाच बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास दादर-परळ स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. दुपारची वेळ असल्याने लोकलला कमी प्रमाणात गर्दी होती. मात्र, बिघाडामुळे कुर्ला ते भायखळ्यापर्यंत लोकलच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी मध्य रेल्वेवरील लोकलसेवा 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत होत्या.

दुपारी साडेतीननंतर बिघाड दुरुस्त करण्यात आला. सतत होणाऱ्या बिघाडामुळे रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर रेल्वे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com