मध्य रेल्वेच्या कामगिरीचा महाव्यवस्थापकांनी घेतला आढावा

central railway
central railwaysakal media

मुंबई : मध्य रेल्वेचे (central railway) महाव्यवस्थापक (general manager) अनिल कुमार लाहोटी (anil kumar lahoti) यांनी मंगळवारी, (ता.3) रोजी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या उपनगरी रेल्वे (Mumbai railway inspection) कामगिरीचा आढावा घेतला. रेल्वेची सुरू असलेली (railway important work) पायाभूत कामे, मालवाहतूक आणि कोचिंग कामगिरीसंबंधी माहिती घेतली. (central railway-general manager-anil kumar lahoti-Mumbai railway inspection-nss91)

विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांनी महाव्यवस्थापकांना उपनगरी वाहतुकीच्या गुंतागुंतीच्या स्वरूपाविषयी तसेच वक्तशीरपणा, मुंबई विभागाची मालवाहतूक, एकाच कॉरिडॉरवर चालवल्या जाणाऱ्या मेल/एक्सप्रेस/विशेष गाड्या, मालगाड्या त्यांची कामगिरी माहिती दिली. सह्याद्री पर्वतरांगेत मुंबईला जोडणारे दोन घाट, लोको शेड, कार शेड, कोचिंग डेपो, टर्मिनल, ईएमयू रेक इत्यादींसह विविध मालमत्तांविषयी देखील माहिती दिली.

central railway
एक लाखाची लाच मागणारे दोन अभियंते 'ACB' च्या जाळ्यात, गुन्हा दाखल

उपनगरीय वक्तशीरपणा 2014-15 मध्ये 86.88 टक्क्यांवरून 2020-2 मध्ये 95.40 टक्क्यांपर्यंत वाढला. लेव्हल क्रॉसिंग गेट्स आणि अतिक्रमण वक्तशीरपणावर परिणाम होत आहे. मात्र, यात सुधारणा करण्यात येत आहेत. मुंबई विभागातील स्थानकांवर टप्प्याटप्प्याने अधिक लिफ्ट आणि एसरकते जिने पुरवण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती गोयल यांनी महाव्यवस्थापकांना दिली. बैठकीत संरक्षा, सुरक्षा, पायाभूत सुविधा, मान्सून संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com