खारकोपर - उरण रेल्वेमार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू; जाणून घ्या या महत्वपुर्ण प्रकल्पाची प्रगती

खारकोपर - उरण रेल्वेमार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू; जाणून घ्या या महत्वपुर्ण प्रकल्पाची प्रगती


मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन व अनलॉक कालावधी दरम्यान मध्य रेल्वेने पायाभूत सुविधा पूर्ण आणि वेगवान केल्या आहेत. त्यामध्ये 27 किलोमीटर लांबीच्या बेलापूर - सीवूड्स - उरण प्रकल्पातील उर्वरित 14.60 कि.मी. खारकोपर - उरण मार्गाला गती दिल्याने संपूर्ण लाइन पूर्ण झाल्यावर मुंबई - उरण मधील अंतर जवळपास 40 ते 50 टक्के कमी होणार आहे. 

मध्य रेल्वेच्या निर्माण विभागाने या प्रकल्पाची गती वाढविल्यामुळे रेल्वेला मुंबई ते जवाहरलाल नेहरू बंदरातील हा महत्त्वपूर्ण प्रवेश योग्य रेल्वे मार्ग पूर्ण करता येणार आहे. खारकोपर - उरण नवीन मार्ग बांधण्याचे काम विविध ठिकाणी बांधकाम यंत्रणेच्या सहाय्याने चालू आहे. पाइल्स बोरिंग मशीन, काँक्रीट प्लेसर बूम, ट्रान्झिट मिक्सर, ट्रिपर्स, जेसीबी, हायड्रस, पोकलेन्स, हायड्रॉलिक जॅक्स इत्यादींसह  मुख्य बांधकाम उपक्रम सुरू आहेत.  

तर रांजनपाडा स्टेशनवरील कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्मचे सुपरस्ट्रक्चरचे काम, न्हावा-शेवा, द्रोणागिरी व उरण स्थानकांवर पाया व उप-रचना काम, उरण येथील सब-वे काम, चैनेज 10975 येथे पूल फाउंडेशनचे काम, स्ट्रेसिंग आणि 7982 पुलावरील यू-गर्डर खाली करण्यात आली आहेत. खारकोपर - उरण दरम्यान 5 स्टेशन, 2 मोठे पूल, 41 छोटे पूल, 2 रोड अंडर ब्रिज आणि 4 रोड ओव्हर ब्रिज असतील.  उपलब्ध कामगारांची सुरक्षा आणि आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी सर्व खबरदारी घेण्यात आल्या आहेत.  लॉकडाउन कालावधी दरम्यान राबविण्यात आलेली कामे आणि पावसाळ्यातील पावसाच्या विश्रांतीमुळे लॉकडाऊनमधील बांधकाम कामकाजासाठी झालेला अपव्यय निश्चितपणे भरून काढणे शक्य होणार आहे.

विमानतळावर जाण्यासाठी सोईचे
मध्य रेल्वे मुंबई उपनगरी नेटवर्कचा चौथा कॉरिडोर असलेला बेलापूर - सीवूड्स - उरण रेल्वे मार्ग, पूर्ण झाल्यामुळे मुंबई ते जेएनपीटी व उरण या प्रवाशांच्या प्रवासाची वेळ कमी होईल व नवी मुंबईत नवीन तयार होत असलेल्या विमानतळावर जाण्याची प्रवाशांना सोय होणार आहे.

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com